Sunita Kejriwal meets Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी (Sunita Kejriwal ) सुनीता केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील मोदी बागेत सुनीता केजरीवाल शरद पवारांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह हेही उपस्थित होते.
तर ठाकरे सीएम व्हावेत यासाठी मी सगळा माहोल तयार केला असता एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
चर्चेचा विषय गुलदस्त्यात
महाराष्ट्रात येत्या 3 महिन्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत. सध्या हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकी लांबणीवर टाकल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ही महत्वाची घडामोड मानली जात आहे. शरद पवार आणि सुनीता केजरीवाल यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांमध्यो कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
तुम्हाला वरळीतून जायचं, गुवाहाटीला जातांना ठाकरेंनी धमक्या दिल्याCM शिंदेंचा खळबळजनक आरोप
स्वबळावर लढणार?
काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी झाली. मात्र, ती विधानसभा निवडणुकीसाठी नव्हती. विधानसभा निवडणुका हा वेगळा विषय आहे. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून मुंबईतील 36 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं प्रीती शर्मा यांनी सांगितं होतं. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे.