Download App

Arvind Kejriwal : चौकशीला दांडी, केजरीवाल गाठणार ‘एमपी’; ‘आप’च्या खेळीने ‘ईडी’ही गोंधळात

Arvind Kejriwal : दिल्ली मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार आज केजरीवाल यांना ईडी चौकशीसाठी हजर रहायचे होते. मात्र, या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी ईडीला पत्र पाठवून नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ईडीने पाठविलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकारणाने प्रेरित आहे. भाजपाच्या सांगण्यावरूनच ही नोटीस पाठविण्यात आली आहे. मला चार राज्यांत निवडणूक प्रचारासाठी जाता येऊ नये, यासाठीच ही नोटीस पाठविण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. ईडीने ही नोटीस तत्काळ मागे घ्यावी, असे म्हटले आहे. तसेच केजरीवाल ईडीच्या चौकशीला जाणार नसून ते मध्य प्रदेशच्या सिंगरौलीमध्ये निवडणूक प्रचाराला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

ED Raids : दिल्ली सरकारचा आणखी एक मंत्री ‘ईडी’च्या कचाट्यात; तब्बल 9 ठिकाणी छापेमारी

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने आप सरकारमधील मंत्री आणि लोकप्रतिनिधींविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आधीपासूनच तुरुंगात आहेत.  काही दिवसांपूर्वी खासदार संजय सिंह यांच्या घरीही ईडीने छापा टाकला होता. चौकशीनंतर त्यांनाही अटक करण्यात आली. सध्या ते कोठडीतच होते. यानंतर थेट मुख्यमंत्री केजरीवाल यांनाच समन्स बजावण्यात आले. त्यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, केजरीवाल ईडीला पत्र पाठवत नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यात सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणा चौकशी करत आहे. या प्रकरणात एप्रिल महिन्यात सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले होते. त्यावेळी केजरीवाल यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले आहे. केजरीवाल यांना पीएमएलए अधिनियमानुसार समन्स बजाविण्यात आले आहेत. या प्रकरणात केजरीवाल यांचा जबाब ईडी घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र,  अजून तरी केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिल्याचे समोर आलेले नाही.

उलट त्यांनी ईडीलाच पत्र पाठवत आपल्याला पाठविलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता केजरीवाल चौकशीसाठी नंतर हजर राहणार का? ईडीचे अधिकारी यावर आता काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार  आहे.

मेजरची लष्करातून तडकाफडकी हकालपट्टी; राष्ट्रपतींचे अधिकार काय सांगतात?

ईडीने (ED) केजरीवाल यांना नोटीस काढत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. आज 2 नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना चौकशीसाठी ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहायचे आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे अटकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार आम आदमी पक्षाचा आहे.

 

Tags

follow us