Download App

काँस्टिट्यूशन क्लब निवडणुकीत भाजपाचा दबदबा; खासदार राजीव प्रताप रूडी विजयी

काँस्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. भाजप खासदार राजीव प्रताप रूडी विजयी झाले.

Constitution Club of India Election Result : काँस्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार राजीव प्रताप रूडी यांचा (Rajiv Pratap Rudy) दबदबा कायम राहिला. या निवडणुकीत रूडी यांनी सचिवपदी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाचे माजी खासदार संजीव बालियान (Sanjeev Baliyan) यांचा पराभव केला.

या निवडणुकीत एकूण 707 मतदान झाले होते. यात 669 मते मतदानाच्या तर 38 मते बॅलेटच्या माध्यमातून टाकण्यात आली होती. यासाठी एकूण 26 राऊंडपर्यंत मतमोजणी झाली. या मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे सचिवपदासाठी 20 वर्षांनंतर निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीची जोरदार चर्चा होती. संजीव बालियान रुडी यांच्याविरोधात उमेदवार होते. याआधी राजीव प्रताप रूडी चार वेळेस सचिवपदी निवडून आले होते. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. दोन्ही नेत्यांनी प्रचारात कोणतीही कसूर ठेवली नाही. खासदारांनी पार्टी लाइनच्या बाजूला जाऊन मतदान केले.

निवडणूक आयुक्त हे सर्वोच्च न्यायालय अन् राष्ट्रपतींपेक्षा मोठे आहेत का ? उद्धव ठाकरे कडाडले

काँस्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत जवळपास 1200 खासदार आणि माजी खासदार मतदार होते. यावेळी 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्यासह अन्य नेत्यांनी मतदान केले होते.

संजीव बालियान रुडी यांच्याविरोधात उमेदवार होते. याआधी राजीव प्रताप रूडी चार वेळेस सचिवपदी निवडून आले होते. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यानुसार राजीव रूडी या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी माजी खासदार संजीव बालियान यांचा पराभव केला.

आता बीसीसीआयवर राहणार वॉच! लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक मंजूर; जाणून घ्या A टू Z माहिती

follow us