तिहार जेलमध्ये गँगवार, ‘प्रिन्स’ला संपविले, दहावीतच गुन्हेगारी जगतात !

Delhi Tihar Jail Gangwar : दिल्लीतील तिहार जेलमध्ये मोठे गँगवार झाले आहे. तिहार जेलमधील तिसऱ्या क्रमांकमधील प्रिन्स तेवतिया नावाच्या कुख्यात कैदाची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. रोहित चौधरी गँगने ही हत्या केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट त्यानंतर कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 25T162007.110

Pune Crime

Delhi Tihar Jail Gangwar : दिल्लीतील तिहार जेलमध्ये मोठे गँगवार झाले आहे. तिहार जेलमधील तिसऱ्या क्रमांकमधील प्रिन्स तेवतिया नावाच्या कुख्यात कैदाची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. रोहित चौधरी गँगने ही हत्या केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट

त्यानंतर कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांचे एक पथक तिहार जेलमध्ये दाखल झाले आहे. पोलिस घटनेची माहिती घेत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स गँगचा प्रिन्स तेवतिया हा सदस्य आहे.

Amit Shah : बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे; ममता सरकार 2025 पूर्वीच कोसळणार

शुक्रवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास हे गँगवार झाले आहे. दोन गटांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. त्यातून एका गटाने प्रिन्स तेवतियावर चाकुने सपासप वार केले. त्यात प्रिन्स व तीन कैदी गंभीर जखमी झाले आहेत. प्रिन्सला दिल्ली हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे.


प्रिन्सची गुन्हेगारी कुंडली

प्रिन्स तेवतिया याच्यावर हत्या, लूटमार, शस्त्र कायदा आणि अन्य कलमानुसार सोळा गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक करून तिहार जेलमध्ये ठेवले होते. 2008 मध्ये प्रिन्सवर मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. तेवतियाचे वडिलांना एका मुलाने मारहाण केली होती.

त्याचा बदला म्हणून प्रिन्स त्या मुलाची हत्या केली होती. 2010 मध्ये त्याला दिल्ली पोलिसांनी आंबेडकर नगरमधून अटक केली होती. त्यानंतर अल्पवयीन असल्याचे दाखविण्यासाठी प्रिन्सने खोटे कागदपत्रे न्यायालयात दाखल होते. त्यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गँगस्टर लॉरेन्स गॅंगशी तो संपर्कात आला होता. प्रिन्सने दहावीतून शिक्षण सोडून दिले होते. लग्नासाठी ते पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर तो गुन्हे करत होते. एका पोलिस चकमकीत तो जखमी झाला होता.

Exit mobile version