Amit Shah : बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे; ममता सरकार 2025 पूर्वीच कोसळणार

Amit Shah : बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे; ममता सरकार 2025 पूर्वीच कोसळणार

Bengal has become the epicenter of bombings; Mamata government will collapse before 2025 : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेला हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र डागलं. बीरभूम जिल्ह्यातील सिउरी येथे जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, ममता बॅनर्जी सरकार 2025 च्या आधी पडेल. यासोबतच यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यात 35 हून अधिक जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

‘बंगालचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल’
तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करताना शाह म्हणाले की, राज्यात बॉम्बस्पोट, घुसखोरी आणि घराणेशाही थांबवायची असेल तर भाजपचा मुख्यमंत्री होईल, यासाठी भाजपला मत द्या. मग ममता दीदीचा जुलूम चालू देणार नाही. ममतादीदी बंगालच्या लोकांसाठी काम करत नाही, त्याचं लक्ष्य हे बंगालच्या लोकांचं कल्याण नाही. त्यांचं एकमात्र, लक्ष्य आपल्या भाच्याला मुख्यमंत्री बनवणे हे आहे, परंतु हे शक्य नाही. कारण, बंगालचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल.

जंगलात एकच वाघ असतो; महाडिकांचा बंटी पाटलांना इशारा

‘भाजपला लोकसभेच्या 35 जागा जिंकून द्या’
रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा संदर्भात बोलतांना शाह म्हणाले की, ममता बॅनर्जी ह्या तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. तृणमूलच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे रामनवमीच्या मिरवणुकांवर हल्ला करण्याचे धाडस वाढले आहे. ममता सरकार राज्यात हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत भाजपला 35 जागा जिंकून राज्यात आपले सरकार बनवा, रामनवमीच्या मिरवणुकीवर पुन्हा हल्ला करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

‘बंगाल बनले बॉम्बस्फोटांचे केंद्र’
बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा समाचार घेत शाह म्हणाले की, दीदींच्या राजवटीत बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे. ते म्हणाले की, एनआयएने अलीकडेच बीरभूममध्ये 80 हजारांहून अधिक डिटोनेटर्स आणि 27 हजार किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले आहे. एनआयएने त्याला जप्त केले नसते तर बॉम्बस्फोटात किती जीव गेले असते, याचा अंदाजही लावणं अवघड आहे. दरम्यान, सभेपूर्वी शाह यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिझरी येथील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube