Delhi Murder : साहिलच्या हातात दोरा अन् गळ्यात रुद्राक्ष! दिल्लीच्या गल्लीत ‘लव्ह जिहाद’ची घटना?

Delhi Murder Case : दिल्लीतील शाहबादमध्ये घडलेल्या क्रुर घटनेतील आरोपी साहिलच्या हातात दोरा अन् गळ्यात रुद्राक्ष घातल्याची माहिती समोर आली आहे. साहिलने दिल्लीतल्या शाहबादमध्ये प्रेयसीवर चाकूने 40 वार केल्यानंतर दगडाचे ठेचून क्रुरपणे हत्या केली. घटनेनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नूकताच द केरला स्टोरी चित्रपट रिलीज झाल्याने ही लव्ह जिहादची घटना […]

Sahil Love JIhad

Sahil Love JIhad

Delhi Murder Case : दिल्लीतील शाहबादमध्ये घडलेल्या क्रुर घटनेतील आरोपी साहिलच्या हातात दोरा अन् गळ्यात रुद्राक्ष घातल्याची माहिती समोर आली आहे. साहिलने दिल्लीतल्या शाहबादमध्ये प्रेयसीवर चाकूने 40 वार केल्यानंतर दगडाचे ठेचून क्रुरपणे हत्या केली. घटनेनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नूकताच द केरला स्टोरी चित्रपट रिलीज झाल्याने ही लव्ह जिहादची घटना तर नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसलाच सुटला पाहिजे; यशोमती ठाकूर आग्रही

जेव्हा पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली त्यावेळी त्यांच्या हातात दोरा, आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष घातल्याचं समोर आलंय. एवढंच नाहीतर साहिल जेव्हा शाहबाद परिसरात अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करीत होता, त्यावेळीही त्याच्या हातात दोरा आणि गळ्यात रुद्राक्ष असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले आहे.

चिंता वाढली, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जूनअखेर पुन्हा येणार कोरोनाची लाट

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये गळ्यात रुद्राक्ष आणि हातात दोरा दिसून आल्याने या घटनेचा संबंध केरला स्टोरीशी लावण्यात येत आहे. या घटनेनंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून हिंदु मुलींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे.

एका समुदायाकडून हिंदु मुलींना टार्गेट केल जात असून यामागचा खरा सुत्रधार कोण आहे? असा सवाल भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे. आरोपीचा फोटो ट्विट करुन भाजप नेते मिश्रा यांनी संताप व्यक्त केला आहे.

Butterfly: आयुष्याला हटके लायटिंग करणाऱ्या ‘बटरफ्लाय’चा टीझर प्रदर्शित, मधुरा वेलणकर दिसणार नव्या भूमिकेत

ते म्हणाले, साहिल नावाच्या नराधमाने अल्पवयीन हिंदु मुलीची निर्घृणपणे चाकून वार करुन हत्या केलीय. या साहिलच्या हातात दोरा कसकायं? हा लव्ह जिहाद आहे, मुलींविरोधात हा नियोजित हल्ला आहे, यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे? असा सवाल कपिल मिश्रा यांनी केला आहे.

दरम्यान, या क्रुर घटनेतील आरोपी साहिलला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version