Delhi Murder Case : दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्यांकांडात पोलिसांना तपासात अनेक खुलासे केले आहेत. पोलिसांच्या तपासात एक ऑडिओ समोर आली आहे. त्यामध्ये ‘ज्यादा बदमाश है क्या तू, कहां चली गई थी तेरी बदमाशगिरी.’असं साक्षी साहिल म्हटल्याचं समोर आलं आहे. साक्षीच्या हत्येनंतर तिची मैत्रिण भावना हिने एक ऑडिओ शेअर केला आहे.
पवारांचा प्लॅन लक्षात येताच नाना पटोलेही झाले सावध; 2 आणि 3 जूनला महत्वाची बैठक
दरम्यान, हत्येच्या एक दिवस आधी साक्षीसह तिची मैत्रीण भावना आणि झबरुने साहिलला धमकावले होते. त्यानंतर साक्षीने साहिलला त्यावेळी तुझी बदमाशगिरी कुठे गेली होती, असं म्हटलं होतं. या ऑडिओमध्ये साहिलचा आवाज येत नसून फक्त साक्षी बोलत आहे.
आदित्य ठाकरेंची आमदारकी मोदींच्या आशीर्वादाने, नितेश राणेंचा हल्लाबोल
मिळालेल्या माहितीनूसार, साक्षी आणि साहिलचा 27 मे रोजी दुपारी 3:41 वाजता व्हिडिओ कॉल झाला होता, त्यानंतर हत्येच्या दिवशी सकाळी 7:19 वाजता साहिल आणि साक्षीमध्ये दोन व्हिडिओ कॉल्स झाले. यावेळी दोन व्हॉईस नोटही पाठवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये साक्षी म्हणत आहे की, ‘तू मोठा बदमाश होत आहेस, त्यावेळी तुझा बदमाशपणा कुठे गेला होता, असा सवाल साक्षीने साहिलला केल्याचं उघड झालं आहे.
Adipurush : ‘आदिपुरुष’च्या रिलीजआधीच सीता पोहोचली नाशिकच्या पंचवटीत; क्रितीचा Video Viral
दरम्यान, झबरुने साहिलला साक्षीपासून दूर राहण्याची धमकीही दिली. आधी तिघांनी मिळून मग नंतर झबरुनेही त्याला धमकी दिल्याने साहिलच्या मनातला रोष वाढला होता. अशातच साक्षीने ‘तू मोठा बदमाश होत आहेस, त्यावेळी तुझा बदमाशपणा कुठे गेला होता, असा सवाल केल्याने साहिलचा रोष वाढत गेला. त्यामुळे त्याने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला.
तुम्हीही उन्हाळ्यात रोज दही खाता का? चुकूनही हे काम करू नका, नाहीतर अडचणी वाढतील
साहिलने सांगितले की, झबरु आणि साक्षीची मैत्री काही दिवसांपूर्वीच झाली होती. झबरुची या भागातील दबंग मुलगा असून हत्येच्या एक दिवस आधीच साक्षी, भावना आणि झबरु यांनी साहिलशी वाद घातला होता. दरम्यान, साहिलला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, साहिलने हत्या केल्यानंतर पोलिस त्याच्या घरी पोहचले, तेव्हा तो घरी नव्हता. त्याचवेळी साहिलच्या मावशीने त्याच्या वडीलांच्या फोनवर तो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये पोहचल्याची माहिती दिली. या फोननंतर पोलिसांनी साहिलचं लोकेशन शोधलं. त्यानंतर साहिलच्या वडिलांना सोबत नेत पोलिसांच्या पथकाने त्याला बुलंदशहर येथून अटक केली.