Download App

Delhi Murder : ‘त्या’ मुलीपासून दूर होशील तितकं चांगलं, दोन्ही बहिणींनी समजावून सांगूनही साहिलने…

Delhi Murder : ‘जेवढ्या लवकर तु त्या मुलीपासून दूर होशील तितकं आपल्यासाठी चांगलं’ असल्याचं म्हणत मुलजिम साहिलला दोन्ही बहिणींनी सल्ला देऊनही साहिलने अल्पवयीन मुलीची वादातून हत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान, दिल्लीच्या शाहबाद परिसरात अल्पवयीन मुलीची तब्बल 40 वेळा चाकून वार केल्यानंतर दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली.

आरोपी मुलजिम साहिल (20) हा दिल्लीच्या शाहबाद इथला रहिवासी असून तो फ्रिज मॅकेनिक आहे. फ्रिज रिपेअरिंगचं काम करुन तो आपला उदरनिर्वाह करीत होता. तर त्याचे वडिलांचं वेल्डिंगचे दुकान आहे. कुटुंबात आई-वडील, दोन बहिणी आणि साहिल असा साहिलचा परिवार आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून साहिलेच 16 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. 16 वर्षीय मुलगी आणि साहिल मागील काही वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची भनक साहिलच्या कुटुंबियांना लागली. त्यानंतर साहिलच्या दोन्ही बहीणींनी त्याला तु त्या मुलीपासून दूर रहा, जेवढ्या लवकर तू तिच्यापासून दूर होशील तितकं स्वत: आणि कुटुंबियांसाठी चांगलं, या शब्दांत साहिलला समजावून सांगितलं होतं.

मात्र, एवढ समजावून सांगूनही साहिलने प्रेमसंबंध सुरुच ठेवले होते. एवढचं नाहीतर पोलिसांच्या माहितीनूसार अल्पवयीन मुलगी आणि साहिल दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये एकत्र होते. त्यांच्या लिव्ह इनमध्येही साहिलच्या बहीणींनी हस्तक्षेप करीत त्याला विरोध केला मात्र, साहिलने मनाचंचं केलं.

Adipurush New Song: ‘आदिपुरुष’ सिनेमातील नवे गाणे ऐकून प्रेक्षक म्हणाले “आम्ही धन्य झालो…”

अखेर साहिल आणि अल्पवयीन मुलीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आलीय. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणामुळे वाद झाले होते, हे अद्याप अस्पष्ट असून वाद सुरु असतानाच अल्पवयीन मुलगी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात असतानाच शाहबादमधल्या रोहिणी भागात साहिलने तिच्यावर चाकूने वारंवार 40 वेळा वार केल्यानंतर तिला दगडाने ठेचून संपवले आहे.

राज्याभिषेक झाला, अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय; राहुल गांधींचा हल्लाबोल

आरोपीवर कडक कारवाई करा :

या घटनेनंतर मी जेव्हा मुलीला पाहिलं तेव्हा तिची परिस्थिती पाहण्यासारखी नव्हती. तिच्या पोटात वार करुन दगडाने ठेचून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. आरोपी साहिल आणि तिच्या नात्याबद्दल मला माहित नव्हत. दोघांमध्ये कसला वाद झाला होता. त्याबाबही मला माहित नाही. मात्र, घटनेतील आरोपीवर शासनाने कडक कारवाई करावी.

दरम्यान, दिल्लीत घडलेल्या क्रुर घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून हत्येचा घटनेचे सीसीटीव्ही फुटेमध्ये आरोपी मुलीवर वारंवार करताना दिसून येत आहे, तर दुसरकीकडे येणारे-जाणारे लोकं बघ्याची भूमिका घेत असल्याचं फुटेजमध्ये निदर्शनास आलं आहे. या घटनेनंतर राजधानी दिल्लीत महिला सुरक्षित आहेत की नाही? हा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us