Adipurush New Song: ‘आदिपुरुष’ सिनेमातील नवे गाणे ऐकून प्रेक्षक म्हणाले “आम्ही धन्य झालो…”
Adipurush New Song Out Now :‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचं नाव आहे. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
तर मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि पहिले गाणे ‘जय श्री राम’ यास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यावर आता निर्मात्यांनी सिनेमातील ‘राम सिया राम…’ हे दुसरे गाणे प्रदर्शित केले आहे.
‘राम सिया राम…’ या गाण्याची सुरुवात प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांच्यामधील संवादाने होत आहे. “तुम राजकुमारी हो जानकी, तुम्हारी जगह मेहलो मैं है” असे राघव आपली पत्नी जानकीला उद्देशून बोलत असल्याचे दिसून आले आहे, यानंतर गाणे सुरु होते. २ मिनिटे ५० सेकंदाच्या या गाण्यात प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांच्यामधील संवाद, १४ वर्षांचा वनवासाच्या दरम्यानचे त्यांचे जीवन दाखवण्यात आले आहे.
हे गाणे संगीत क्षेत्रातील लोकप्रिय आणि सध्याची आघाडीची जोडी सचेत-परंपरा यांनी संगीतबद्ध केले आहे, त्यांनीच गायले आहे नेटकरी सध्या या जोडीचे विशेष कौतुक करत आहेत. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला या गाण्याचे गीतकार आहेत. सोमवारी (२९ मे) दुपारी बारा वाजता सर्व म्युझिक चॅनल, फिल्म चॅनल, रेडिओ स्टेशन आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.
राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले
प्रदर्शित झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात या गाण्याला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर चाहत्यांनी कमेंट करत आमच्याकडे शब्द नाहीत, “प्रभू श्रीरामाचे भजन ऐकून आम्ही धन्य झालो…”, जय श्री राम अशा प्रतिक्रिया देत आदिपुरुषच्या टीमचे कौतुक केले आहे. दरम्यान, ‘आदिपुरुष’ सिनेमात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. १६ जून रोजी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.