Arvind Kejriwal : दारु घोटाळा प्रकरणी जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने याचिका दाखल केली असून केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्याची मागणी ईडीकडून करण्यात आलीयं.
Delhi excise policy case: Enforcement Directorate moves an application in court seeking 14-day extension of Delhi Arvind Kejriwal's judicial custody ahead of 2nd June
— ANI (@ANI) May 20, 2024
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर तिहारमधून बाहेर आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा अंतरिम जामीन पूर्ण होण्यापूर्वीच आज ईडीने दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केलीयं. ज्यामध्ये ईडीने 2 जूननंतर अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत आणखी 14 दिवस वाढ करावी, असे म्हटले आहे.
विश्वविक्रम रचत दीप्ती जीवनजीची सुवर्ण भरारी! जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मधील कामगिरी
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे ईडीने केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलीयं. न्यायालयीन कोठडीच्या याचिकेवर न्यायालयाने ईडीला प्रश्न विचारला असता, ते शरण आल्यावर ही याचिका घ्यावी, असे ईडीने सांगितले. त्यानंतर कोर्टाने विचारले की त्याला शरण येण्यास सांगितले कुठे, कोर्टात की जेलमध्ये? त्यावर ईडीने म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल तुरुंगात शरण आले तरी त्यांची न्यायालयीन कोठडी तिथेच निश्चित करावी. त्यानंतर न्यायालयाने ईडीची याचिका प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.