Devendra Fadanvis on Rahul Gandhi Press Conference about ECI and Votes : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत कर्नाटक लोकसभा आणि हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा दावा केला.त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला आहे.
शरद पवारांना धक्का , आगामी निवडणुकांपूर्वी ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
ना देशात ना महाराष्ट्रात मतांची चोरी झाली आहे. चोरी झाली आहे ती राहुल गांधींच्या डोक्यातील चिप आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. म्हणून ते त्याच त्याच गोष्टी आणि खोटं बोलतात. वेगवेगळे आकडे देतात. दरवेळी तरी नवं सांगून सणसणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना समजलेलं आहे की, त्यांना बिहार आणि पुढच्या कोणत्याही निवडणुकीत निवडून येता येणार नाही. म्हणून हे त्याचं कव्हर फायरिंग आहे.
#WATCH | Mumbai | On Lok Sabha LoP Rahul Gandhi's allegations on the EC, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "Neither has there been theft of votes in Maharashtra nor in any other parts of the nation…Rahul Gandhi is just lying and is stealing the mandate of the public…His… pic.twitter.com/OwmQp0Ztvd
— ANI (@ANI) August 7, 2025
परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?, 25 टक्के टॅरिफवरून ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल..
त्यामुळे राहुल गांधींना माझा एक प्रश्न आहे की, जर त्यांना मतदार वाढल्याची शंका आहे. तर मग आता बिहारमध्ये निवडणुक आयोगाने मतदारांचं व्हेरीफिकेशन म्हणजे सर्वसमावेशक पुनरावलोकन सुरू केलं आहे. तर त्याला ते विरोध का करत आहेत? सर्वसमावेशक पुनरावलोकन हेच मतदार याद्या सुधरवण्यासाठी महत्त्वाचं आहे. पण ते त्याला विरोध करत आहेत. जेणे करून लोकशाहीतील संस्थांवरून लोकांचा विश्वास उडाला पाहिजे. अशी त्यांची मानसिकता आहे. कारण त्यांच्या पक्षाला भविष्य नाही.
मोठी बातमी! जेपी नड्डा उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार? महत्वाची अपडेट समोर…
काय म्हणाले राहुल गांधी?
एक्झिट पोल काहीतरी वेगळेच सांगतात पण निकाल वेगळाच लागतो. महाराष्ट्रात 40 लाख मतदार संशयित आहे. एक काळ असा होता जेव्हा देशात मतदानासाठी इलेक्टॉनिक मशीन्स नव्हत्या मात्र तरीही संपूर्ण देशात एकाच दिवशी मतदान करत असे पण आज उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे मतदान होते. बिहारमध्ये इतर वेळी मतदार होते. मतदान महिने चालते. आम्हाला याची चिंता आहे. महाराष्ट्रात 5 महिन्यांत इतके मतदार जोडले गेले आहेत जे 5 वर्षात जोडले गेले नाहीत. महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार जोडले गेले आहेत ज्यामुळे अधिक संशय निर्माण होते. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले.