Download App

मोनालिसा भोसलेने प्रयागराज सोडले? व्हायरल गर्ल आता कुठे गेली?

प्रयागराजच्या (Prayagraj) महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh Mela) अनेक गोष्टींची देशभर चर्चा झाली. इथले पवित्र स्नान, इथे नागा साधू, आयआयटीवाले (IIT) बाबा, चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली. पण सोशल मिडियावर सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं ते मोनालिसा भोसलेने (monalisa bhosle). घारे डोळे, त्यावर काळेभोर काजळ आणि मनमोहक चेहरा अशी मोनालिसा मागच्या आठवड्यापासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता याच व्हायरल गर्लने प्रयागराज आणि महाकुंभमेळा सोडल्याची चर्चा आहे. प्रयागराज सोडण्यापूर्वी तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आवाहन केलं होतं. पण या आवाहनाचा काहीही उपयोग झाला नाही.

नेमकी कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती कुठून आली होती? आणि आता कुठे गेली आहे? योगी आदित्यनाथ यांना तिने काय आवाहन केले? पाहुया या…

मोनालिसा ही मुळची इंदूरमधील माहेश्वरी परिसरातील एका गरीब कुटुंबातील मुलगी. आपल्या कुटुंबासह जवळपास 50 जणांसोबत ती महाकुंभमेळ्यात ती क्रिस्टल, रुद्राक्ष आणि कंठी माळा विकत होती. गत आठवड्यात महाकुंभाला आलेल्या काही युट्यूबर्सनी तिच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर तिचा व्हिडीओ देशभरात व्हायरल झाला. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरले. अवघ्या काही तासात ती सोशल मीडियावर स्टार बनली.

मी अभिनेत्री होणारचं अन्…; महाकुंभातील व्हायरल मोनालिसाने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

पण याच प्रसिद्धीने तिच्या अडचणी वाढवल्या होत्या. मोनालिसाच्या बहि‍णींनींनी सांगितले की, युट्यूबर्स, सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि अगदी सामान्य लोकही मोनालिसाच्या मागे धावायचे. ती जिथे जायची तिथे तिच्या मागे यायचे. मोनालिसा बाहेर पडायची तेव्हा गर्दी तिला घेरायची. लोक तिच्यासोबत फोटो काढयला आणि तिच्याशी बोलायला भाग पाडण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच वेळी, काही लोकांनी मोनालिसाला महाकुंभातून अक्षरशः उचलून नेण्याचीही धमकीही दिली होती. या सगळ्या प्रकारामुळे आम्हाला भीती वाटू लागली होती.

शिवाय मोनालिसा तिचे कामच करू शकत नव्हती. त्यामुळे आमच्या वडिलांनी तिला मध्य प्रदेशला घरी परत पाठवले आहे, असे मोनालिसाच्या बहि‍णींनी सांगितले. मोनालिसाच्या बहिणी अजूनही महाकुंभमेळ्यात माळा विकताना दिसतात. मोनालिसाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली होती. पण या आवाहनाच फारसा उपयोग झाला नाही. या कारणांमुळे मोनालिसाला महाकुंभ सोडावा लागला. थोडक्यात सोशल मीडियावर व्हायरल होणे मोनालिसासाठी अडचणीचे कारण बनले होते.

आयआयटीयन बाबांची महाकुंभातून हकालपट्टी; कोणाकडे असतो कुंभातून बाहेर काढण्याचा अधिकार?

त्याचवेळी मोनालिसा महाकुंभ मेळ्यातच आहे. महाकुंभ संपल्यानंतरच ती घरी परतेल. अजूनही लोक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी येत आहेत, असे तिच्या आजोबांनी सांगितले. शिवाय मोनालिसाने इंस्टाग्रामवर तिच्या जवळच्या लोकांसोबत केक कापतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये मोनालिसा अगदी मनमोकळे पणाने हसताना दिसत आहे. कुंभमेळा सोडल्याची चर्चा असतानाच मोनालिसाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का बनला आहे. यावेळी मोनालिसाने “मला इतके प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.” असे म्हणत चाहत्यांच्या प्रेमाला दादही दिली.

पण आता मोनालिसा नेमकी महाकुंभमध्ये आहे की घरी गेली याबाबत कन्फुजनच आहे…

follow us