महाकुंभात 50 कोटी भारतीयाचं गंगास्नान, जाऊ न शकलेल्यांच्या घरी पवित्र जल; CM फडणवीसांनी केलं कौतुक

महाकुंभात 50 कोटी भारतीयाचं गंगास्नान, जाऊ न शकलेल्यांच्या घरी पवित्र जल; CM फडणवीसांनी केलं कौतुक

CM Devendra Fadanvis Said 50 Crore Indians Holy Bath In Mahakumbh : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) कुटुंबासमवेत महाकुंभमेळ्यामध्ये (Mahakumbh) जाऊन प्रयागराजमध्ये गंगास्नान केलंय. आपल्या देशातील कुंभमेळा पाहून जगभरातील लोकं आश्चर्यचकीत झाल्याचं त्यांनी सांगितलंय. आत्तापर्यंत महाकुंभमध्ये 50 कोटी भाविकांनी गंगास्नान केलंय, असं फडणवीस म्हणालेत. तसेच व्हॅल्यूएबल ग्रुपने सत्संग फाउंडेशनने हे महाकुंभातील गंगाजल (Prayagraj) आणून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलंय.

भाजप प्रदेशाध्यक्ष कोण होणार? मार्च महिन्यात शिक्कामोर्तब; बावनकुळेंनी काय सांगितलं?

नागपूरमध्ये व्हॅल्यूएबल ग्रुपने सत्संग फाउंडेशनसोबत मिळून महाकुंभातील पवित्र जल पोहोचविण्याचा उपक्रम राबविला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्हॅल्यूएबल ग्रुपने सत्संग फाउंडेशनसोबत मिळून हा पवित्र जल सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविलाय. त्याबद्दल धन्यवाद. ज्यांना कुंभमेळ्याला जाता येत नाही, त्यांच्यासाठी ही एक संधी उपलब्ध करून दिली. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पादुका या ठिकाणी आणलेले आहे.

इतका मोठा कुंभ पर्व सुरू असताना जाऊ शकत नाही, हे शल्य होतं. त्यांच्यासाठी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलीय. प्रयागराजमधील संगमाचं पाणी इथंच आपल्या अंगावर पडतंय. दुधात साखर असा योग म्हणजे संतांच्या पादुकांचे दर्शन देखील आपल्याला मिळतंय. राज्यातील सर्व संतांच्या पादुकाही इथं दर्शनासाठी आणण्यात आल्या असल्याचं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

वाल्मीक कराडची ‘बी टीम’ सक्रिय; आम्हाला धमक्या येतायेत, धनंजय देशमुखांनी थेट नावच सांगितली

दिल्लीतील घटना दुर्दैवी असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेईल, याची ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. दिल्लीतील दुर्घटना असून त्यावर सगळ्यांनी दुःख व्यक्त केलंय. या पद्धतीच्या घटना होऊ नये, यासाठी प्रशासन निश्चित स्वरूपांत कारवाई करेल असंही फडणवीस म्हणालेत.

सुप्रीम कोर्टाला लव्ह जिहादची वास्तविकता दिसून आली आहे, एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मच्या व्यक्तीशी लग्न करणे गैर काही नाही. पण खोटं बोलुन लग्न करणे आणि मूल जन्माला घालून सोडून देणे, हे जे काही सुरू आहे ते अत्यंत वाईट असल्याचं म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube