Mahakumbh : आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, CM योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर…
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे आयोजित केलेल्या महाकुंभ (Mahakumbh 2025) मेळ्याला आज गालबोट लागले. मौनी अमावस्येनिमित्त जमलेल्या भाविकांमुळे संगम घाटावर (Sangam Ghat) चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ( Prayagraj stampede) १० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता सुमारे 20 तासांनी प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जारी केली. या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत.
‘मी उपोषण करणार नाही, आता वेगळ्या मार्गाने…’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मृतांपैकी २५ जणांची ओळख पटली आहे. तर इतर लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचं महाकुंभाचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितलं. ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना प्रयागराजमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सर्वांवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे आदेश दिल्याचंही कृष्णा यांनी सांगितलं.
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर
योगी आदित्यनाथ म्हणाले की, या घटनेने मला खूप दु:ख झालं. सर्व मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. सुमारे ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. ३६ जखमींवर प्रयागराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य सरकारकडून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन आयोगाकडून चौकशी केली जाईल. तसेच ही समिती निर्धारित वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले
संगम घाट घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत चार वेळा फोन केला आहे आणि गृहमंत्री अमित शाहा आणि भाजप अध्यक्ष जे.के. पी. नड्डा यांनीही संपर्क साधल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.