‘मी उपोषण करणार नाही, आता वेगळ्या मार्गाने…’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले होतं. गेल्या ५-६ दिवसांपासून जरांगे हे अंतरवली सराटीत उपोषण (Maratha Reservation Protest) करत आहेत. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आता उपोषण थांबवण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलाय. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं हत्या प्रकरण तापलेलं आहे. त्यावरुन लक्ष हटू नये म्हणून उपोषण सोडणार असल्याचं जरांगे म्हणाले.
‘मराठ्यांविषयी द्वेष, तुम्हाला सोडणार नाही, मी खानदानी औलाद’, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा
जरांगे यांच्या आंदोलनाची आणि त्यांनी केलेल्या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळं जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आम्ही आज, उद्या निर्णय करून उपोषण थांबवणार आहोत. कारण संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्येचा खटला मागे राहू नये. आम्हाला तिकडेही बघायचं आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा विचार करून आम्ही आंदोलन थांबवत आहोत. आता मी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे. मी आता उपोषण करणार नाही. पण आता मी झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी १२ वाजता उपोषण, सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे, असं जरांगे म्हणाले.
फडणवीस द्वेष भावनेनं वागतात…
पुढं बोलतांना ते म्हणाले की, एक गोष्ट चांगली झाली की, फडणवीस यांना आम्ही आव्हान केलं होतं – की आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार की नाही? त्यांनी मागण्या मान्य न केल्यानं आता आमचे डोळे उघडले. समाजाचे डोळे उघडले. मराठा द्वेषी कोण आहे? हे समाजाला कळणं गरजेचं होतं. आता दूध का दूध, पाणी का पाणी झालं. फडणवीस द्वेष आणि सुड भावनेने वागतात, हे आता लोकांना कळलं असेल.
मुख्यमंत्री मराठ्यांशी गद्दारी करणार नाही, असं वाटलं होतं, पण फडणवीस लक्षच द्यायला तयार नाहीत. लपवा-छपवी सरकारकडून सुरू आहे. धस यांचं येणं किंवा सरकारकडून आश्वासन म्हणजे लपवा-छपवीच. फडणवीस यांच्याकडून मराठ्याबाबत गद्दारी आणि बेईमानी केली. फडणवीसांचा आनंद जास्त दिवस राहणार नाही. त्यांच्या आनंदावर विरजण पडेल, असा इशाराही जरांगेंनी फडणवीसांना दिला.
The Mehta Boys : ‘द मेहता बॉईज’ चा धमाकेदार ट्रेलर, अविनाश तिवारीने जिंकली चाहत्यांची मने
ते म्हणाले की, फडणवीस तुम्ही मराठ्यांचे मनं जिंकायला हवे होते. पण तसं झालं नाही. आता जगात आमचं कुणी नाही… मराठ्यांविषयी फडणवीस यांच्या मनात द्वेष, सूड घेण्याची भावना आहे. फडणवीस हे किती मराठा द्वेषी आहेत, हे आता उघड झालं. तरीही फडणवीस यांना मी बोललो नाही. पण पुढे फडणवीस यांना सोडणार नाही. मला मनोज जरांगे म्हणतात. मी खानदानी औलाद आहे, असा थेट इशाराही जरांगेंनी दिला.