‘प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नाही…’, अधिकाऱ्याने सांगितलं मध्यरात्री 1 वाजता नेमकं काय घडलं?

  • Written By: Published:
‘प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नाही…’, अधिकाऱ्याने सांगितलं मध्यरात्री 1 वाजता नेमकं काय घडलं?

Prayagraj stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे आयोजित केलेल्या महाकुंभ (Mahakumbh 2025) मेळ्याला आज गालबोट लागले. मौनी अमावस्येनिमित्त जमलेल्या भाविकांमुळे संगम घाटावर (Sangam Ghat) चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ( Prayagraj stampede) अनेकजण जखमी झाले असून २० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण या सगळ्यात एसएसपी राजेश द्विवेदी यांचे एक धक्कादायक विधान समोर आलंय.

Prajakta Gaikwad : प्राजक्ताचा नऊवारी साडीत मराठमोळा लूक 

चेंगराचेंगरी झाली नाही. फक्त गर्दी जरा जास्त असल्याने काही भाविक जखमी झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असं ते म्हणाले.

एएनआयशी बोलतांना राजेश द्विवेदी म्हणाले, कोणतीही चेंगराचेंगरी झालेली नाही. फक्त गर्दी जास्त असल्याने काही भाविक जखमी झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका. ते पुढे म्हणाले की, अनेक घाट पूर्ववत झाले असून लोक त्या घाटांमध्ये सहज डुबकी मारू लागले आहेत. माझ्याकडे मृतांची किंवा जखमींची संख्या नाही,असंही ते म्हणाले.

डीआयजी काय म्हणाले?

दरम्यान, डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, १० कोटींहून अधिक भाविकांचे आगमन अपेक्षित असल्याने ही दुर्घटना घडली. ते म्हणाले की, पोलिस आणि प्रशासन सर्व आखाड्यांना त्यांच्या पारंपारिक मिरवणुकीत मदत करतील. सध्या सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे.

मोठी बातमी! ‘तर… थेट वाहनच होणार जप्त’, पोलीसांनी दिल्या महत्वाच्या सूचना… 

मुख्यमंत्री योगींची अधिकाऱ्यांसोबत बैठक

या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करताना काही भाविक गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजधानी लखनऊमध्ये राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

आदित्यनाथ म्हणाले, संगम घाटावर मोठ्या संख्येने भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण प्रशासन घटनास्थळी सज्ज आहे. अमृत ​​स्नानासाठी पहाटे १ ते २ च्या दरम्यान भाविक आखाडा मार्गावर जमले होते. तिथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेड्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संगम घाट घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत चार वेळा फोन केला आहे आणि गृहमंत्री अमित शाहा आणि भाजप अध्यक्ष जे.के. पी. नड्डा यांनीही संपर्क साधल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube