Download App

Rakesh Pal : मोठी बातमी! भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन

Rakesh Pal : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने

  • Written By: Last Updated:

Rakesh Pal : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल (Rakesh Pal) यांचे चेन्नईत (Chennai) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे राकेश पाल 25 वे महासंचालक होते. राकेश पाल जानेवारी 1989 मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी चेन्नईत राकेश पाल यांना श्रद्धांजली वाहिली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना चेन्नईमधील राजीव गांधी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरु  करण्यात आले होते  मात्र त्यांना वाचवता आले नाही. त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, राकेश पाल यांनी भारतीय नौदल शाळा द्रोणाचार्य, कोची येथे तोफखाना आणि शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये व्यावसायिक कौशल्य प्राप्त केले होते. तसेच त्यांनी ब्रिटनमधून इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्युशन कोर्सही केला होता. राकेश पाल यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय तटरक्षक दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

‘लय बेस्ट, वाघ मागत नसतो अन् …’, जरांगेंचा संभाजी भिडेंना प्रत्युत्तर

भारतीय तटरक्षक दलाचे महानिदेशक राकेश पाल यांच्या अकाली निधनाने खूप दु:ख झाले. ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते ज्यांच्या नेतृत्वाखाली ICG भारताची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी मोठे पाऊल उचलत होते. असे ट्विट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले .

follow us