Download App

लाच घेतल्याप्रकरणी ‘गेल’च्या संचालकांना सीबीआयकडून अटक

गॅस पाईपलाईन प्रकल्पातील कंत्राटदारांकडून लाच घेतल्याप्रकरणी ‘गेल’चे संचालक के. बी. सिंह यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सिंह यांच्यासह इतर चार जणांनाही अटक करण्यात आली असून आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

Jaane Jan चा ट्रेलर रिलीज; विद्या, तापसीनंतर करीना दिसणार मर्डर मिस्ट्रीत

उत्तर प्रदेशातील नोएडा, विशापट्टणमसह इतर भागांत गॅस पाईपलाईनच्या प्रकल्पाचं काम सुरु आहे, या प्रकल्पातील काही कंत्राटदारांचा फायदा करुन देत असल्याचं सांगत कें.बी. सिंह यांनी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे, या प्रकरणी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली असून आरोपींच्या घरातून मोबाईल, फोन, गॅजेट्स आणि बंक खात्यातील माहिती तपासण्यात आली आहे.

Maratha Reservation फडणवीसांची क्षमायाचना म्हणजे एकप्रकारची कबुलीच – शरद पवार

विशाखापट्टणममधील श्रीकाकुलम ते अंगुल आणि विजयपूर ते औरैया भागात सुरु असलेल्या गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये एका कंपनीला फायदा करुन देण्यासाठी सिंह यांना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे, या प्रकरणी गेलच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची माहिती सीबीआयला मिळाली. त्यानंतर सीबीआयने सिंह यांना अटक केली आहे.

के. बी. सिंह यांच्यासह वडोदरा येथील अॅडव्हान्स्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक सुरेंद्र कुमार यांचा समावेश असून सुरेंद्र कुमार यांच्यावर दोन गॅस पाईपलाईन प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांना मदत करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. लाच प्रकरणी सीबीआयने दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

Tags

follow us