Jaane Jan चा ट्रेलर रिलीज; विद्या, तापसीनंतर करीना दिसणार मर्डर मिस्ट्रीत

Jaane Jan चा ट्रेलर रिलीज; विद्या, तापसीनंतर करीना दिसणार मर्डर मिस्ट्रीत

Jaane Jan Trailer Out : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘जाने जान’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करीना कपूर खान गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. त्यामुळे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता तिचा ‘जाने जान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटाच्या माध्यामातून करीनाने ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी नगर दौऱ्यावर…जाणून घ्या, कारण…

कसा आहे हा चित्रपट?
‘जाने जान’ या चित्रपटात करीना दमदार भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. त्यात तो करीना भोवती फिरणारा असल्याने चाहत्यांनी हा ट्रेलर रिलीज होताच अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. करीना सह या चित्रपटामध्ये विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट जपानी कादंबरी किगो हिगाशिनो यांच्या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी 2005 मध्ये आली होती. तिचं नाव ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ अंस आहे. त्यामुळे चाहते हा चित्रपट पहण्यासाठी उत्सुक आहेत. ट्रेलमध्ये करीनासह विजय वर्माने ही लक्ष वेधले तो एक डिटेक्टव्हच्या भूमिकेत आहे. करीना त्याची सस्पेक्ट म्हणजे संसयित आहे.

फडणवीसांकडून मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

हा चित्रपट 21 सप्टेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय रॉय यांनी केलं आहे. तर निर्माती एकता कपूर आहे. दरम्यान करीना ‘द क्रु’ या चित्रपटामध्ये देखील काम करत आहे. तिचा हा चित्रपट 22 मार्चला रिलीज होण्याची शक्यता आहे. यामध्ये क्रिती सेनन आणि तब्बू देखील असणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube