उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी नगर दौऱ्यावर…जाणून घ्या, कारण…

उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी नगर दौऱ्यावर…जाणून घ्या, कारण…

Udhav Thackeray : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला मात्र तरी देखील अपेक्षित असा पाऊस झाला नाही आहे. अशीच काहीशी परिस्थिती नगर जिल्ह्यात देखील झाली आहे. दरम्यान, याच परिस्थिची माहिती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 8 सप्टेंबरला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आगामी काळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका असल्याने ठाकरे यांच्या या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे.

Sukhee Trailer: ठरलं तर मग! शिल्पा शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा ट्रेलर येणार ‘या’ दिवशी

गेल्या काही दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील पिके करपू लागली आहेत. यातच उत्तरेकडील भागामध्ये देखील पावसाअभावी परिस्थिती भयाण झाली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 8 सप्टेंबर रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ठाकरे हे दुष्काळाची पाहणी करणार आहेत.

Maharashtra Rain : मान्सून अ‍ॅक्टिव्ह! आज ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

आपल्या दौऱ्यादरम्यान ठाकरे हे संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गट नगर जिल्ह्यात ताकदीने उतरणार आहेत. त्यामुळे या भागातील दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी उद्धव ठाकरे हे करणार आहेत.

Jalna Maratha Protest : ‘मी क्षमा मागतो’, फडणवीसांनी लाठीचार्ज प्रकरणी मागितली माफी

जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढतेय :
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्ष मजबुतीसाठी व बळकटीकरणासाठी सरसावले आहे. यातच निवडणुका पाहता ठाकरे गटात देखील इनकमिंग सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वीच भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियाशी तुलना; CM स्टॅलिन यांच्या मुलाला ‘इंडिया’तील पक्षांनीही फटकारलं

ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहे. हे होते तोच आता नुकताच भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी देखील हाती शिवबंधन बांधले आहे. यामुळे आगामी निवडणुका पाहता नगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube