Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले करत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, 29 जुलै रोजी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकारने दोन्ही सभागृहात विशेष चर्चेसाठी 16 तासांचा वेळ दिला आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून पहिल्या दिवसापासून होत होती. तर आता एक मोठी बातमीसमोर आली आहे. या बातमीनुसार, ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष चर्चा होणार असून यासाठी सरकारकडून 16 तासांचा वेळ देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. भारताच्या या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
IND vs ENG: भारताची प्रथम फलंदाजी, करुण नायरसह 2 खेळाडू बाहेर