Download App

Diwali Gold Purchase : दिवाळीत सोनं खरेदी करताय? जरा थांबा! सोनं खरं की खोटं असं ओळखा

Diwali Gold Purchase : दिवाळीमध्ये (Diwali 2023)लोकांचा सोनं खरेदीकडे (Gold Buying)अधिक कल असतो. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री (gold)होते. सोन्याचे भावही गगनाला चांगलेच तेजीत असतात. सध्या 61 हजार रुपयांच्यावर पोहोचला आहे. सोनं हे महाग असल्यामुळे ते घेताना आपल्याला त्याच्याबद्दल काही बेसिक माहिती असलीच पाहिजे.नाहीतर आपली फसवणूक (Froad)होण्याची दाट शक्यता आहे. सोनं खरं की खोटं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही माहिती फायद्याची ठरु शकते.

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ तारखेला मिळणार PM किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता

दिवाळीत सोने खरेदीसाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात. कारण दिवाळ्याच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याचा HUID नंबर तपासायला विसरू नका. 1 एप्रिलपासून सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, कोणत्याही ज्वेलर्सला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) शिवाय सोने विकता येणार नाही. हा HUID नंबर कसा काम करतो? त्याचे फायदे काय आहेत आणि HUID च्या बाबतीत काय लक्षात ठेवले पाहिजे? याची माहिती जाणून घेऊया.

पुण्यात जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात, कंटेनरच्या धडकेत दोघे जागीच ठार, ४ ते ५ जण गंभीर जखमी

HUID क्रमांक म्हणजे काय?
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. या क्रमांकावरुन सोन्याची गुणवत्ता आणि शुद्धता समजते. सोन्याचे दागिने किंवा वस्तूंवर हा क्रमांक नंबर असतो. या नंबरवरुन सोन्याच्या दागिन्याबाबत संपूर्ण माहिती मिळते. याआधी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क नंबर होते. मात्र, आता सरकारने चार अंकी हॉलमार्कवर बंदी घातली आहे.त्यामुळे फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे.

HUID आणि हॉलमार्कमध्ये फरक काय?
HUID अंतर्गत तुम्ही तुमच्या दागिन्यांची माहिती हॉलमार्किंगपेक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने मिळवू शकता. HUID च्या मदतीने तुम्ही तुमचे दागिने ऑनलाइन ओळखू शकता. हॉलमार्किंगमध्ये ही सुविधा नव्हती. या नव्या प्रणालीमुळे दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यावर एक विशिष्ट क्रमांक असणार आहे.

HUID मार्क कसे ओळखावे?
बीआयएस केअर अॅपवरील ‘व्हेरिफाइड एचयूआयडी’ ऑप्शनचा वापरुन ग्राहक हॉलमार्क केलेल्या सोन्याचे दागिने HUID क्रमांकासह व्हेरिफाय करू शकतात. हे अॅप Android आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

Tags

follow us