Gold Rate : सोने लवकरच 62,000 पार, आज सोन्याने घेतली मोठी झेप
Gold Rate : आज सराफा बाजारात सोन्याचा भाव पाहता तो लवकरच 62 हजार रुपयांच्या पुढे जाईल असे वाटते. ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा दर 61,500 च्या वर व्यवहार करत आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोन्याचा दर 521 रुपयांनी वाढून 61,565 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव 1,077 रुपयांच्या वाढीसह 76,359 रुपयांवर व्यवहार करत आहे.
सोन्याच्या किमतीत वाढ
काल सोन्याचा भाव 61, 044 रुपयांवर बंद झाला होता. आज सोन्याचा भाव 521 रुपयांनी वाढून 61,565 रुपयांवर व्यवहार करत आहे. 22 कॅरेट सोन्यात वाढ झाली आहे, ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात. 22 कॅरेट सोन्याचा भाव 477 रुपयांनी वाढून 56,393 रुपयांवर आहे.
अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…
सोन्याच्या किमतीत वाढ होणार
तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा भाव यंदा 64,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्यावर विश्वास ठेवला तर सोन्याचा भाव यंदा चढाच राहू शकतो आणि किंमत 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. आता 2023 मध्ये तो किती काळ हा स्तर गाठेल हे पाहायचे आहे.