Download App

दिया कुमारी होणार राजस्थानच्या उपमुख्यमंत्री, मुघलांशी आहे खास कनेक्शन

Diya Kumari : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्या नावे जाहीर झाली आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje) यांना मुख्यमंत्री पदाचे सिंहासन मिळाले नाही. भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) हे मुख्यमंत्री असतील तर सोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी एका उपमुख्यमंत्र्यांचे थेट राजघराण्याशी संबंध आहेत. जयपूर (पूर्वी आमेर) राजघराण्याशी संबंधित असलेल्या दिया कुमारी (Diya Kumari) यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यांच्यासोबत प्रेम शंकर बैरवा (Prem Shankar Bairwa) हे देखील उपमुख्यमंत्री असतील.

दिया कुमारी यांचे मुघल घराण्याशी कनेक्शन
दिया कुमारी केवळ जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित नाही तर त्यांच्या कुटुंबाचे मुघलांशीही संबंध आहेत. दिया कुमारी यांचे आजोबा महाराजा मानसिंग द्वितीय हे जयपूर संस्थानाचे शेवटचे शासक होते. इंग्रज भारतातून निघून गेल्यानंतर हे संस्थानही नाहीसे झाले. या घराण्याचे ब्रिटिशांशीच नव्हे तर मुघलांशीही विशेष नाते होते. दिया कुमारी यांचे पूर्वज ‘मान सिंग पहिला’ हे मुघल सम्राट अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक होता.

द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट या वेबसाईटवर मानसिंग प्रथम यांचे छायाचित्र उपलब्ध आहे. चित्रासोबत मानसिंग प्रथम यांची माहिती लिहिली आहे. यामध्ये त्यांना मिर्झा राजा म्हणूनही ओळखले जात असे.

पहिल्यांदाच आमदार अन् राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा आहेत तरी कोण?

1562 मध्ये मानसिंग प्रथम अकबराच्या दरबारात सामील झाले. मानसिंगला एका लग्नामुळे ही संधी मिळाली. अकबराने आमेरचा राजा बिहार मल यांच्या मोठ्या मुलीशी विवाह केला. अकबराच्या या पत्नीने मानसिंग प्रथम यांना दत्तक घेतले होते. अशा प्रकारे मानसिंग प्रथम यांचा मुघलांशी संबंध आला. पुढे ते अकबराचा अतिशय प्रिय झाला. पुढे मानसिंगच्या कुटुंबाचे इतर मुघल शासकांशीही चांगले संबंध होते.

विधानसभा निवडणुकीत दिया कुमारी यांना विद्याधर नगरमधून तिकीट दिल्याने विद्यमान आमदार नरपत सिंह राजवी प्रचंड संतापले होते. दिया कुमारी यांच्यावर प्रश्न उपस्थित करताना राजवी यांनी मुघलांसमोर शरणागती पत्करलेले कुटुंब असे म्हटले होते.

कोण आहे दिया कुमारी?
प्रिन्सेस दिया कुमारी फाउंडेशनच्या वेबसाइटनुसार, दिया कुमारी ह्या सवाई भवानी सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांची एकुलती एक मुलगी आहे. सवाई भवानी सिंग हे जयपूर संस्थानाचे शेवटचे शासक मानसिंग दुसरा याचा मुलगा होते.

MLA Disqualification Case : गुवाहाटीचे तिकीट कोणी काढले ? दीपक केसरकरांना तिखट सवाल

दिया कुमारीची आई पद्मिनी देवी याही राजघराण्यातील होत्या. त्या सिरमौरच्या (आता हिमाचल प्रदेशचा भाग) महाराजांची मुलगी होत्या. म्हणजे दियाचे आजी-आजोबाही महाराज आणि महाराणी होते.

दिया कुमारीचे वडील सवाई भवानी सिंह यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी होते. ते 10 व्या पॅराशूट रेजिमेंटच्या पॅरा कमांडोचे लेफ्टनंट कर्नल आणि कमांडिंग अधिकारी होते. युद्धानंतर त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले.

दिया कुमारी 2019 मध्ये राजसमंदमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण, भाजपने त्यांना 2023 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत उभे केले आणि विद्याधर नगरमधून त्यांना तिकीट दिले. तीन वेळा आमदार नरपत सिंह राजवी यांचे तिकीट रद्द करून भाजपने विद्याधर नगरमधून दिया कुमारी यांना उमेदवारी दिली होती.

Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM

ताजमहालवर केला होता दावा
जयपूरच्या राजघराण्यातील दीया कुमारी यांनी 2022 मध्ये दावा केला होता की ताजमहाल त्यांच्या कुटुंबाच्या जमिनीवर बांधला गेला आहे. कुमारी म्हणाल्या की, ताजमहाल ज्या जमिनीवर बांधला आहे तो राजघराण्याचा राजवाडा होता आणि तो मुघल सम्राट शाहजहानने ताब्यात घेतला होता.

43 वर्षांपूर्वींच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संघर्ष यात्रेतून शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा

त्या म्हणाले होते, “तेव्हा त्यांचे (मुघल) सरकार होते. आजही एखाद्या सरकारने तुमच्याकडून जमीन घेतली तर ते तुम्हाला मोबदला देते. त्यावेळी नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याचे मी ऐकले आहे. पण त्या वेळी असा कोणताही कायदा नव्हता की जिथे तुम्ही दाद मागू शकता. ताजमहालची जमीन निश्चितपणे राजघराण्याची जमीन आहे.

अलाहाबाद हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्याचा संदर्भ देत त्या म्हणाले होत्या की, कोणीतरी आवाज उठवला आणि याचिका दाखल केली हे चांगले आहे. जर काही कागदपत्रे किंवा कशाचीही गरज असेल, तर कोर्टाने आदेश दिल्यास आम्ही कागदपत्रे देऊ.

follow us