Download App

‘हनुमानजी पहिले अंतराळवीर’; भाजपचे खासदार अनुराग ठाकूर बोलून बनले टीकेची धनी…

हनुमानजी अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती असल्याचा दावा भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केला आहे. त्यानंतर विरोधी खासदारांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली.

Anurag Thakur : मला वाटतं की हनुमानजी अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती होते, असं विधान भाजपचे खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केलंय. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त हिमाचल प्रदेशात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

खासदार ठाकूर यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. या विधानानंतर डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी जोरदार टीका केलीयं. अनुराग ठाकूर यांच्यासारखे नेते आपल्या तामिळनाडूमध्ये नाहीत हे सुदैव असल्याची टीका खासदार करुणानिधी यांनी केलीयं.

अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर करुणानिधी म्हणाल्या, तुम्ही जर लहान मुलांना चंद्रावर सर्वप्रथम कोण गेलं, याबाबत विचारलं तर नील आर्मस्ट्रॉंग असं उत्तर विद्यार्थी देतील. पण उत्तरेकडील काही नेते आपल्या लोककथांमधील आजी आणि हनुमान यांनी सर्वात आधी चंद्रावर पाऊल ठेवल्याचा दावा करु शकतात. सुदैवाने असे लोकं नेते आपल्या तामिळनाडूमध्ये नाहीत, असं खासदार कनिमोझी बोलताना मदुराई येथील कार्यक्रमात म्हणाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; वक्फ स्थापनेसाठी ५ वर्षे इस्लामचे पालन करणे आवश्यक नाही

काय म्हणाले होते अनुराग ठाकूर?
अंतराळ दिनानिमित्त ठाकूर हिमाचल प्रदेशातील एका शाळेत कार्यक्रमानिमित्त गेले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. संवाद साधताना त्यांनी अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते असा सवाल केला. या सवालावर विद्यार्थ्यांनी नील आर्मस्ट्रॉंग असं उत्तर दिलं,, पण मला वाटतं हनुमानजी अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय.

दरम्यान, मागील महिन्यात राष्ट्रीय अंतराळ दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान, ठाकूर यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. यावेळी बोलताना ठाकूर यांनी पौराणिक कथा आणि विज्ञानाचे मिश्रण करीत विधान केले. त्यांनी इंग्रजांनी दिलेल्या पुस्तकांच्याही पुढे शिक्षकांनी गेले पाहिजे, असा सल्लाही दिला आहे.

follow us