खुनाचा प्रयत्न अन् ‘या’ कलमांखाली राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून गुन्हा दाखल
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संसदेत झालेल्या गोंधळानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या विरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात (Parliament Street Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
भाजपकडून (BJP) राहुल गांधी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपने भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 109, 115 आणि 117 अंतर्गत राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात संसदेत कॉंग्रेस खासदार निदर्श करत होती. यावेळी भाजप खासदारही आंदोलन करत होती. त्यामुळे कॉंग्रेस खासदार आणि भाजप खासदार समोरासमोर आले आणि गोंधळ निर्माण झाला. यात भाजप खासदार प्रताप सारंगी (Pratap Sarangi) आणि मुकेश राजपूत (Mukesh Rajput) जखमी झाले. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले की, आम्ही आज राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शारीरिक हल्ला आणि चिथावणी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुकेश राजपुत यांच्या डोक्याला दुखापत झाली असून प्रताप सारंगी यांनाही मार लागली आहे. त्यामुळे आम्ही आज राहुल गांधी यांच्याविरोधात कलम 109, 115, 117, 125, 131 आणि 351 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.
… तर पुरुषांना दोन लग्न करावे लागेल, नितीन गडकरी असं का म्हणाले?
तर तक्रार देण्यासाठी गेलेले भाजप खासदार बन्सुरी स्वराज म्हणाल्या की, ही वृत्ती केवळ अशोभनीयच नाही तर गुन्हेगारीही आहे आणि म्हणूनच आज आम्ही सर्वजण येथे (पोलीस ठाण्यात) आलो आणि तक्रार दाखल केली. सुरक्षा दलांनी राहुल गांधींना वारंवार विनंती केली होती की तुमच्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे तुम्ही अत्यंत शांततेत संसदेत प्रवेश करू शकता, परंतु राहुल यांनी ही विनंती फेटाळली असेही यावेळी भाजप खासदार बन्सुरी स्वराज म्हणाल्या.