Download App

EVM मधून डेटा डिलीट करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

Supreme Court On EVM : सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) ईव्हीएममधील (EVM) डेटा नष्ट करू नये

  • Written By: Last Updated:

Supreme Court On EVM : सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) ईव्हीएममधील (EVM) डेटा नष्ट करू नये असे निर्देश दिले. निवडणुकीनंतर ईव्हीएम पडताळणीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला मोठा आदेश दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, सध्या ईव्हीएममधून कोणताही डेटा हटवला जाऊ नये आणि त्यात कोणताही नवीन डेटा रीलोड केला जाऊ नये.

आज झालेल्या या सुनावणीत मतदान संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसाठी मानक कार्यप्रणाली काय आहे ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला निवडणुकीनंतर ईव्हीएम मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर जाळण्याच्या प्रक्रियेची माहिती द्यावी लागणार आहे. माहितीनुसार, मतमोजणी संपल्यानंतरही मशीनमधील डेटा नष्ट करू नये. अशी मागणी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने या याचिकेत केली आहे.

या जनहित याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर झाली. सरन्यायाधीश खन्ना म्हणाले की हे विरोधी नाही. जर पराभूत उमेदवाराला स्पष्टीकरण हवे असेल तर इंजीनियर स्पष्टीकरण देऊ शकतो की ईव्हीएममध्ये छेडछाड झालेली नाही.

ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही याची खात्री करण्यासाठी ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरची पडताळणी व्यावसायिक इंजीनियरकडून करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), हरियाणा काँग्रेस नेते करण सिंग दलाल यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये ईव्हीएमची मूळ जळालेली मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी धोरण तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.

मोठी बातमी, LoC वर IED स्फोट; एका अधिकाऱ्यासह दोन लष्करी जवान शहीद

निवडणूक निकालांवरील शंका आणि ईव्हीएम छेडछाडीच्या संशयाची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. आता यावर पुढील सुनावणी 17 मार्च रोजी होईल.

follow us