EVM संदर्भात सुप्रिया सुळेंनी घेतली वेगळी भूमिका; म्हणाल्या, पुराव्याशिवाय दोष…

EVM संदर्भात सुप्रिया सुळेंनी घेतली वेगळी भूमिका; म्हणाल्या, पुराव्याशिवाय दोष…

Supriya Sule Reaction On EVM Congress Shiv Sena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण पराभव झाला. त्यानंतर या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलंय. विरोधकांनी देखील ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला आहे. ईव्हीएम यंत्रामधील फेरफारच्या मुद्द्यावरून यंत्रणेवर टीका केली जातेय. कॉंग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून यासंदर्भात स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची देखील आता यावर प्रतिक्रिया समोर आलीय. सुप्रिया सुळेंनी मात्र यासंदर्भात वेगळी भूमिका घेतल्याचं दिसलंय.

सावधान! उद्यापासून ‘या’ जिल्ह्यांत गारपीट अन् जोर’धार’; अवकाळीचा तडाखा बसणार?

खासदार सुप्रिया सुळे बुधवारी 25 डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ठोस माहिती नसल्याशिवाय ईव्हीएमला दोष देणार नाही. मी याच ईव्हीएम (EVM) मशीनवर चार निवडणुका जिंकल्या आहेत, असं देखील सुळे म्हणाल्यात. ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीमध्ये झालेल्या घोळामुळे संशयास्पद वातावरण तयार झालंय. याचा अभ्यास केला पाहिजे, या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार आहे. या आक्षेपांमध्ये तथ्य असेल तरच त्या गोष्टी बाहेर येतील, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“मी राजकारणात येणारच नव्हतो पण..”, देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून फडणवीस सरकारवर निशाणा (Maharashtra Politics) साधलाय. आता मला देखील भीती वाटू लागली, असं सुळे म्हणाल्या आहेत. राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्या अशोभनीय असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच परभणीमधील घटना निंदनीय असल्याची टीका देखील सुप्रिया सुळेंनी केलीय.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा घटनांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालणार नसल्याची टीका देखील त्यांनी केलीय. या प्रकरणांच्या मुळाशी जावून तपास झाला पाहिजे, अशी सु्प्रिया सुळेंनी मागणी केलीय. राज्यामध्ये अगोदर इतकं भीतीदायक वातावरण नव्हते, पण मला देखील आता भीती वाटू लागलीय. चित्रपटांमध्ये असणारं गुन्हेगारीचं चित्र राज्यात पाहायला मिळंतय, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube