शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार? विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार? विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Sharad Pawar May Take Big Decision : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालाय. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. विधानसभेत शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, परंतु निकालाने मात्र त्यांना मोठा धक्का (Maharashtra Politics) बसला. पक्षाला केवळ दहाच जागांवर यश मिळालं.

मोठी बातमी! जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला, विमानसेवा विस्कळीत; प्रवासी ताटकळले

पराभवानंतर शरद पुन्हा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आता बदलाचं वारं वाहायला सुरूवात झालं असल्याची देखील माहिती मिळतेय. त्यामुळे यावेळी शरद पवार हे संपूर्ण भाकरीच फिरवणार असल्याचं दिसतंय.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष यासोबत विविध सेलचे प्रमुख देखील बदलले जाणार आहेत. 8 आणि 9 जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मुंबईत जंबो बैठक आयोजित करण्यात आलीय. ही बैठक नरिमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

स्टार्टअपसाठी वरदान! मोदी सरकारच्या ‘या’ स्कीम आहेत खास, वाचा सविस्तर..

मुंबईत 8 जानेवारी होणाऱ्या बैठकीत सर्व सेल, आमदार, खासदार आणि विभाग प्रमुख असणार आहेत. तर 9 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आमदार, खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांमध्ये चर्चा होणार आहे. या दोन दिवस होणाऱ्या बैठकीमध्ये शरद पवार हे सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आहेत. त्यानंतर मात्र अनेक पदांवरील प्रमुख बदलण्यात येणार असल्याचं समोर येतंय.

शरद पवार हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार का, यासंदर्भात देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पक्षातील काहीजणांना जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून हवेत. त्यामुळे त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद कायम राहील का? नाही राहिल्यास पुन्हा पक्षात नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube