Parliament Security Breach : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरू असून आज लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असतांना सुरक्षा व्यवस्थेला बगल देत प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या. दरम्यान, या दोन अज्ञात लोकांनी स्मोक बॉम्ब (Smoke bomb) फेकले. त्यानंतर संपूर्ण लोकसभेत धूर दिसत होता. मात्र, नंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. सपा खासदार डिंपल यादव (Dimple Yadav) यांनी सांगितले की, येथे येणारे पाहुणे आणि पत्रकार टॅग ठेवत नाहीत. ही सुरक्षा त्रुटी आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे.
‘सागर’ला संसदेचा पास देणारे खासदार प्रताप सिम्हा नेमके आहेत कोण?
खासदार दानिश अली यांचे म्हणणे आहे की, ज्या व्यक्तीने सभागृहात उडी मारली तो एका खासदाराच्या नावाने बनवलेल्या लोकसभा व्हिजिटर पासवापरून आतामध्ये आला. याशिवाय सभागृहाबाहेरून एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. अशा स्थितीत त्या व्यक्तीने सहज उडी मारलेल्या प्रेक्षक गॅलरीची उंची किती आहे आणि लोकसभेत विरोधी पक्षासाठी व्हिजिटर पास कसा बनवला जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संसदेत कुणीही जाऊ शकतं का?
हो, संसदेत कुणीही जाऊ शकतं. मात्र, तुम्हाला हवं तेव्हा संसदेत जाता येत नाही. संसदेत जाण्यासाठी एक वेगळी प्रक्रिया असते. संसदेच्या कामकाजाच्या वेळेत लोक संसदेला भेट देऊ शकतात. संसदेत सामान्य जनतेला संसदेचे कामकाज पाहण्यासाठी प्रवेश दिला जातो, ज्यासाठी सभागृहात एक प्रेक्षक गॅलरी आहे. जिथून लोक सभागृहाचे कामकाज पाहू शकतात.
Parliament : देशाच्या संसदेवर ‘गॅस’अॅटॅक? सभागृहात धुरच धुर करणारा ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?
पास आवश्यक असतो
संसदेत जाण्यासाठी संसद सचिवालयातून पास काढला जातो. लोकसभेत प्रवेशासाठी किंवा अभ्यागत पाससाठी खासदाराची शिफारस आवश्यक असते. तुम्ही खासदारांना याबाबत विचारू शकता. खासदाराने शिफारस केल्यानंत तुम्हाला संसदेत जाण्यासाठी पास मिळू शकतो. हा पास एकट्या व्यक्तीलाही मिळू शकतो. किंवा ग्रुपसाठीही बनवता येतो. बऱ्याचदा शाळकरी मुलांनाही संसद दाखवली जाते, त्यांच्यासाठी वेगळा पास बनवला जातो.
जर तुम्हाला संसद संग्रहालयाला भेट द्यायची असेल, तर त्यासाठी थेट प्रवेश उपलब्ध आहे. यासाठी संसद सचिवालयातून पास काढण्याची गरज नाही.
किती सुरक्षा तपासणीनंतर प्रेक्षक गॅलरीत प्रवेश मिळतो?
कोणत्याही व्यक्तीला सभागृहात पोहोचण्यासाठी दोन स्तरांवर तपासणी करावी लागते. त्यानंतरच लोकसभेचे किंवा राज्यसभेचे कामकाज पाहण्यासाठी पोहोचता येईल. संबंधित व्यक्तीची तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जातो. खासदार बसतात ज्या ठिकाणी बसतात, त्या जागेच्या मागे प्रेक्षक गॅलरी आहे, जी जमिनीपासून काही मीटर उंचीवर बांधलेली आहे. जेथे लोक सभागृहाचे कामकाज पाहतात. मात्र, मैदान आणि प्रेक्षक गॅलरी यांच्यातील अंतर इतके कमी नाही की कोणीही सहज उडी मारू शकेल. एवढ्या चेकिंगमध्ये स्मोक बॉम्ब सदनात पोहोचणे ही सुरक्षेतील मोठी त्रुटी आहे.
सभागृहाच्या सुरक्षेबाबत अनेक खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. येथे दाखल झालेल्या दोघांचे पास कोणत्या खासदाराच्या सूचनेवरून बनवण्यात आले होते. ते भाजपचे आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तर लोकसभा अध्यक्षांनी माहिती दिली की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून लवकरच त्यांची चौकशी केली जाईल.