Delhi Earthquake: मोठी बातमी, दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

Delhi Earthquake: देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, राजधानी दिल्लीत

Delhi Earthquake

Delhi Earthquake

Delhi Earthquake: देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, राजधानी दिल्लीत दोन दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यावेळी भूकंपाची तीव्रता 3.7 होती. भूकंपाचे (Delhi Earthquake) केंद्र हरियाणातील झज्जर (Jhajjar) येथे होते.

तर दुसरीकडे गुरुवारी सकाळीही दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. गुरुवारी सकाळी हरियाणातील झज्जरजवळ 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे धक्के दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्येही जाणवले.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले की भूकंपाचे केंद्र झज्जरच्या ईशान्येस 3 किलोमीटर आणि दिल्लीच्या पश्चिमेस 51 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होते.

दिल्लीत भूकंप का होतात?

दिल्ली-एनसीआर भूकंपीय क्षेत्र IV मध्ये येते, जो मध्यम ते उच्च जोखीम क्षेत्र आहे. ते हिमालयीन टक्कर क्षेत्रापासून फक्त 250 किमी अंतरावर आहे, जिथे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स आदळतात. या टक्करमुळे ऊर्जा जमा होते, जी भूकंपाच्या स्वरूपात सोडली जाते.

सरकारी कंपनीत काम शिकण्याचा दरमहा मिळणार पगार, अप्रेटिंस पदाचे 350 जागा, आजच करा अर्ज 

तसेच, दिल्लीजवळ अनेक फॉल्ट लाईन्स आहेत. यामध्ये दिल्ली-हरिद्वार रिज, सोहना फॉल्ट, यमुना नदी रेषा आणि महेंद्रगड-डेहराडून फॉल्ट यांचा समावेश आहे. या फॉल्ट लाईन्समुळे दिल्ली भूकंपांना बळी पडते. याशिवाय धौला कुआंसारख्या भागात जिथे तलाव आहेत, तिथे दर 2-3 वर्षांनी छोटे भूकंप होतात.

Exit mobile version