Download App

राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली; लग्न अन् सामाजिक कार्यक्रम ठरले विघ्न

  • Written By: Last Updated:

जयपूर : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) केली होती. यात राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तारखांची घोषणा झाल्यानंतर त्या त्या राज्यांत विजयाच्या दृष्टीने हालचालींना वेग आला होता. परंतु, राजस्थानमध्ये (Rajasthan) होणाऱ्या मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, येथे 23 नोव्हेंबर ऐवजी आता 25 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे तर, मतमोजणी ठरल्याप्रमाणे 3 डिसेंबर रोजीच होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (ECI Change Date Of Rajasthan Assembly Election)

तारीख का बदलण्यात आली ?

निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी 23 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात विवाहसोहळे आणि सामाजिक कार्यक्रम आहेत. यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय होऊ शकते. तसेच याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरदेखील होऊ शकतो, असे मत अनेक राजकीय पक्षांकडून व्यक्त करण्यात आला होता. या सर्व मागण्यानंतर आता राजस्थानमध्ये होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने निवेदनात स्पष्ट केले आहे.

पाच राज्यांच्या सर्व्हेत ‘कमळ’ कोमेजलं

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेपूर्वीची सेमिफायनल म्हणून बघितले जात आहे. तारखांची घोषणा होताच आता कोणत्या राज्यात कुणाला सत्ता मिळणार याचा अंदाज बांधणारा सी-व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. यात भाजपला केवळ राजस्थानमध्ये विजय मिळवता येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही ठरला

भाजपच्या हातून मध्य प्रदेश जाणार?

आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप विजयसाठी कंबर कसून मैदानात उतरणार आहे. मात्र, त्या आधी सत्तेत असणाऱ्या भाजपला मध्य प्रदेशात पराभवाचा सामना करावा लागेल असा अंदाज सी व्होटरच्या सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. ओपिनियन पोलनुसार, मध्य प्रदेशातील एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक 113-125 जागा मिळतील तर, भाजपला 104 ते 116 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बसपाला 0 ते 2 जागा तर, अन्य पक्षांना 0 ते 3 जागा मिळतील.

राजस्थानमध्ये काँग्रेसला बसणार धक्का

सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राजस्थानमधील एकूण 200 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 127-137 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही आकडेवारी काँग्रेसाठी मोठा धक्का असेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिल असा अंदाज लावण्यात आला असून त्यांना 59 ते 69 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. तर, 2 ते 6 जागा अन्य पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.

Tags

follow us