Download App

अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा! बाबा पूर्णपणे बरे; नंदना सेन यांची माहिती

Image Credit: Letsupp

Amartya Sen Death News : भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अमर्त्य सेन पूर्णपणे बरे असल्याची माहिती अमर्त्य सेन यांची कन्या नंदना सेन यांनी दिली आहे. नंदना यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

वृत्तसंस्थांकडून अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याची बातमी देण्यात आली होत. मात्र, त्यांचा मृत्यू झाला नसल्याचं समोर आलं आहे. नंदना सेन त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाल्या, “तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद पण ही खोटी बातमी आहे, बाबा पूर्णपणे बरे आहेत. आम्‍ही नुकतंच कुटुंबासोबत केम्ब्रिजमध्‍ये आठवडा घालवला. आम्ही बाय म्हटल्यावर काल रात्री त्‍यांची मिठी नेहमीसारखीच होती! ते हार्वर्डमध्ये आठवड्यातून दोनवेळा अभ्यासक्रम शिकवत आहेत, सध्या ते लिंगसंदर्भातील पुस्तकावर काम करत असून नेहमीप्रमाणे व्यस्त!” असं नंदना सेन यांनी म्हटलं आहे.

Hema Upadhyay Murder Case : पती चिंतन उपाध्यायसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा!

अमर्त्य सेन यांना प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 साली झाला. त्यांचं संपूर्ण बालपण विश्वभारती कॅम्पसमध्ये केलं. प्रसिद्ध संस्कृतज्ञ क्षिती सेन या त्यांच्या आजी होत्या.

Israel Hamas War: युद्धामुळे सोने-चांदी महाग होणार ? शेअर बाजारालाही फटका!

रविंद्रनाथ टागोर यांनी डॉ. अमर्त्य सेन यांचं नाव ठेवल्याचं बोललं जातं. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं.

Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 3 डिसेंबरला येणार निकाल

अमर्त्य सेन यांनी केंब्रिज विद्यापीठात पीएचडी पूर्ण केली. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते. तर हिंदुस्थानात ते जादवपूर विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षणसंस्थांमध्येही त्यांनी काही काळ अध्यापन केलं. अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले हिंदुस्थानी होते. त्यांच्या पश्चात मुलगी अभिनेत्री नंदना सेन असा परिवार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज