Download App

मोठी बातमी! ‘टीएमसी’ नेत्याच्या घरावर पहाटेच ‘ईडी’ची छापेमारी, बंगालमध्ये खळबळ

ED Raids TMC Leader House : पश्चिम बंगालमध्ये राजकीय (West Bengal) वातावरण पुन्हा तापले आहे. ईडीने आज पहाटेच मोठी कारवाई (ED Raids TMC Leader House) केली आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. याआधी जेव्हा ईडीचे (ED) पथक छापा टाकण्यासाठी गेले होते तेव्हा या पथकावर हल्ला करण्यात आला होता. आज मात्र पहाटेच ईडीचे पथक त्यांच्या घरी धडकले. घराचे कुलूप तोडून अधिकारी आत घुसल्याचे सांगण्यात येत आहे. मागील अनुभव पाहता या पथकाबरोबर 100 सुरक्षारक्षक आहेत. शेख यांच्या घरापासून ते रस्त्यापर्यंत केंद्रीय दलाची टीम हजर आहे. सुरक्षारक्षकांनी शेख यांच्या घराला घेराव टाकला आहे.

तिसऱ्यांचा ईडीची नोटीस; चौकशीसाठी बोलविले पण अरविंद केजरीवालांनी दिल्ली सोडली

ईडीचे पथक आज पहाटे दुसऱ्यांदा शाहजहान शेख यांच्या घरी दाखल झाले. यावेळी सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा पथकाबरोबर आहे. स्थानिक पोलिसांची तुकडीही येथे तैनात आहे. यानंतर हा छापा टाकण्यात आला आहे. याआधी ईडीच्या पथकाने 11 जानेवारीला छापा टाकला होता. त्यावेळी पथकावरच हल्ला करण्यात आला होता. रेशन घोटाळ्यात ही छापेमारी करण्यात आली होती. यानंतर स्थानिकांची गर्दी जमा झाली. पथकाला घेरण्यात आले. इतकेच नाही तर त्यांच्याकडील मोबाइल, लॅपटॉप आणि पैसेही काढून घेण्यात आले. आता पुन्हा ईडीचे पथक येथे आले आहे.

शाहजहान शेखविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून शेख विदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याला पकडता येईल. ईडीने दिलेल्या तक्रारीनंतर शाहजहान शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. टीएमसी नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर पुढे काय कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सूरज चव्हाण यांच्यावर घरावर ईडीचा छापा, आदित्य ठाकरे म्हणाले..

 

 

follow us