Sanjay Singh arrested : दिल्लीतील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या ईडी कोठडीत मंगळवारी न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. सिंह यांना ईडीने 4 ऑक्टोबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. रिमांड संपल्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. आता पुन्हा न्यायालयाने त्यांची ईडी कोठडी वाढवली.
दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने संजय सिंह यांच्या कोठडीत आणखी तीन दिवस वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने संजय सिंह यांना 5 दिवसांची कोठडी मागितली होती. ईडीने संजय सिंह यांच्यावर सहकार्य न केल्याचा आरोप केला होता आणि त्यांची कोठडी वाढवण्याची विनंती केली होती. संजय सिंहचा जवळचा सर्वेश मिश्रा देखील तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीने केला आहे.
अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन निधनाची अफवा! बाबा पूर्णपणे बरे; नंदना सेन यांची माहिती
ईडीने सांगितले की, गोळा केलेल्या पुराव्यांवरून स्पष्टपणे दिसून येते की दारूच्या परवान्यासाठी लाच मागितली गेली होती. यापूर्वी दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात न्यायालयाने संजय सिंह यांना हजर असताना मीडियाला मुलाखत देऊ नये असे निर्देश दिले होते. कोर्टाने मीडियाला त्यांना प्रश्न विचारू नका, असे सांगितले.
दरम्यान, ईडीने 4 सप्टेंबर रोजी सकाळी 7 च्या सुमारास आपचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापेमारी केली होती. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणासंदर्भात चौकशीसाठी हा छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीत सलग 10 तास संजय सिंह यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सिंह यांच्या घरातून आणि कार्यालयातून काही कागदपत्र जप्त करण्यात आले होते.