Download App

‘पैसे दे नाहीतर जुनी केस पुन्हा उघडतो’; लाच मागणं ED अधिकाऱ्याच्या अंगलट…

ED officer arrested : जुनी केस उघडण्याची धमकी देत सरकारी डॉक्टरांकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यालाच लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी ईडी अधिकाऱ्याला फिल्मी स्टाईलने रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

अजितदादांनी जरांगे पाटलांचे कान टोचले; भुजबळांचीही अप्रत्यक्ष भूमिका मांडली…

नेमकं प्रकरण काय?
सुरेश बाबू असं या डॉक्टराचं नाव असून बाबू दींडीगुलच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहेत. याआधीच्या काळात सुरेश बाबू यांच्यावर बेहिशोबी संपत्तीचा खटला दाखल आहे. हीच केस पुन्हा उघडण्याच्या तयारीत ईडी आहे. केस उघडू नये म्हणून, ईडी अधिकाऱ्याने सुरेश बाबू यांना 3 कोटी रुपयांची लाच मागितली. नंतर या प्रकरणी दोघांमध्ये 51 लाख रुपये देण्याचं ठरलं. त्यातील 20 लाख रुपये सुरेश बाबू यांनी मागील महिन्यात दिले आहेत.

जयंत पाटलांना माघारी फिरवणारे पवारचं; भुजबळांनी अजितदादांसमोर सांगितलं चिडचिड होण्याचं कारण

त्यानंतर उर्वरीत पैशांसाठी सुरेश बाबू यांच्याकडे ईडी अधिकाऱ्यांकडून मागणी होत गेली. अखेर सकाळी 6 च्या सुमारास मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना २० लाख रुपयांची व्यवस्था करून दिंडीगुल–मदुराई राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रोडवर उभ्या असलेल्या कारच्या बूटवर ठेवण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांचा फोन आला.

Exit Poll 2023 MP : मध्य प्रदेशात कॉंग्रेसची बाजी? ‘इतक्या’ जागा जिंकणार; समोर आली आकडेवारी…

डॉक्टरांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी रात्री त्यांच्याशी संपर्क साधला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ईडी अधिकाऱ्याला अडकवण्यासाठी सापळा रचला. साध्या वेशातील अधिकारी कारजवळ थांबले होते. सुरेश बाबू यांनी ब्रीफकेस बूटमध्ये ठेवल्यानंतर साध्या वेशात थांबलेल्या अधिकाऱ्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.

Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणार का? म्हणाले, आधी लोकसभेची निवडणूक नंतर…

कार मदुराईच्या दिशेने जात असताना, त्यांनी त्यांच्या वाहनात पाठलाग केला आणि कारकडे लक्ष ठेवण्यासाठी टोल गेटला इशारा दिला. कार टोल गेटजवळ आल्यावर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून कारसह ईडी अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. ईडी अधिकारी अंकित तिवारी असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कारमधून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले.

दरम्यान, तिवारी यांची तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातून मदुराई येथे बदली झाली होती. तो कार्यालयात नवीन असल्याने या खंडणीच्या बोलीमध्ये ईडीचे आणखी काही अधिकारी सहभागी झाले असावेत, असा संशय अधिकाऱ्यांना आहे.

Tags

follow us