Download App

मोठी बातमी! अनिल अंबानींविरुद्ध ED ची कारवाई; तब्बल 50 ठिकाणी टाकले छापे

ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिगचा तपास सुरू केला आहे.

ED on Anil Ambani Group : प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांच्याविरुद्ध (Anil Ambani) ईडीचा फास आवळत चालला आहे. ताज्या घडामोडीत ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिगचा तपास सुरू केला आहे. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 48 ते 50 लोकेशन्सवर ईडीची शोधमोहिम सुरू आहे. सीबीआयने दोन एफआयआर दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. हा पैसा अन्य कंपन्यांत वळवण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूक आणि सरकारी संस्थांची फसवणूक केली. काही मोठ्या संस्थांनीही माहिती ईडीला दिली. यामध्ये नॅशनल हाउसिंग बँक (NHB) सेबी आणि नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) आणि बँक ऑफ बडोदा सहभागी आहेत.

अनिल अंबानींच्या मुलावर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला एक कोटी रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

ED कडून धक्कादायक खुलासे

ईडीच्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सन 2017 ते 2019 दरम्यान Yes Bank कडून तब्बल 3 हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. नंतर हाच पैसा अन्य कंपन्यांत वळवण्यात आला. इतकेच नाही तर कर्ज मंजूर करून घेण्यासाठी येस बँकेचे अधिकारी आणि प्रमोटर्सना लाच दिल्याचीही माहिती उघड झाली आहे.

एकाचवेळी 50 ठिकाणी छापे

केंद्रीय तपास संस्थेने या प्रकरणात देशातील 48 ते 50 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे की Yes Bank ने RAAGA कंपन्यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केले. कर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे बॅकडेटमध्ये तयार करण्यात आले. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार क्रेडिट अॅनालिसिस न करताच मोठी रक्कम गुंतवणूक करण्यात आली. कोणतेही कागदपत्राविना आणि योग्य तपासणी न करताच कर्ज मंजूर करण्यात आले. अनेक कंपन्यांचे डायरेक्टर्स आणि पत्ते एकसारखेच आहेत. एकाच दिवसात कर्जासाठी अर्ज आणि खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. काही वेळी तर कर्ज मंजूर होण्याआधीच पैसे ट्रान्सफर करण्यात आले.

परकीय चलन उल्लंघन प्रकरणात अनिल अंबानी ईडीसमोर हजर

follow us