Download App

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ब्रेनस्ट्रॉक, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात

  • Written By: Last Updated:

(विशेष प्रतिनिधी – प्रफुल साळुंखे)
गुजरात चे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या मुलाला ब्रेनस्ट्रॉक झाल्याने त्याला मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुलाला सुरळीत हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त आणि ट्राफिक विभागाने कंबर कसली होती त्याला वेळेवर उपचार मिळाल्याने अखेर अनुज वर हिंदुजा रुग्णालयात यशस्वी शत्रक्रिया करण्यात आली आहे.

गुजरात चे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांचा एकुलता एक मुलगा अनुज याला काल ब्रेनस्ट्रोक झाला होता. त्याला स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री पटेल हे नरेंद्र मोदी तांच्या मन की बात कार्यक्रांत व्यस्त होते. हा कार्यकारम सोडून ते तात्काळ स्थानिक रुग्णयात गेले. या ठिकाणी अनुजवर शत्रक्रिया करण्यात आली पण प्रकृती सुधारत नसल्याने त्याला मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला.

भुपेंद्र पटेल यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. एकनाथ शिंदे यांनी तात्काळ न्यूरोसर्जन मिश्रा यांच्याशी संपर्क साधत सर्व व्यवस्था करण्याचे विनती केली.

आता मोठा प्रश्न होता अनुजला वेळेकर रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. यासाठी अनुजला एअर अम्बुलंसने रुग्णाला आणण्यात आले. विमानतळ ते रुग्णालय या अंतरात असलेल ट्राफिक क्लियर करणे अत्यंत गरजेचे होते. आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमा निमित्त अनेक रॅली आणि सकाळचा वेळ असल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेली गर्दीचे नियोजन करत अम्बुलंसला रस्ता मोकळा करणे गरजेचे होते.

घोटाळा करुन सत्तेत आलेले बोलताना घोटाळा करतात; अजित दादांचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई चे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व ट्राफिक उपायुक्त यांनी सर्व यंत्रणा कामाला लावत ट्राफिक नियंत्रित केली. केवळ 11 मिनिटात अम्बुलंस हिंदुजा रुग्णालयात पोहचवण्यात आली या ठिकाणी अनुज वर शत्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी रुग्णालयात जाऊन पटेल कुटुंबाची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पटेल यांच्या मदतीला धाऊन आले .

Tags

follow us