Download App

निवडून येणारी सरकारं पाडली जातायत…कपिल सिब्बलांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी सत्तेत असलेले सरकार जात नवं सरकार अस्तित्वात आले आहे. याच मुद्द्यावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रत्यक्ष नाव न घेता भाजपाला टोला लगावला आहे. 2014 नंतर देशात आठ सरकार पडली. मेघालय, मनीपूर, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील निवडून आलेली सरकारे पाडली गेली आहेत. तरीही न्यायालय आणि जनता शांत आहे, अशा शब्दात सिब्बल यांनी एकप्रकारे सत्ताधाऱ्यांवर निशाण साधला आहे.

खासदार कपिल सिब्बल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व विरोधकांना एका मंचावर येण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी सिब्बल यांनी विविध मुद्द्यांवर सत्ताधारी, भाजप व केंद्र सरकारवर टीका केली आहे. सिब्बल म्हणाले, कोणाच्या विरोधातही इडीचा वापर केला जात आहे. इडी कुठेही जाऊ शकते.

इडीच्या माध्यमातून लोकांना धमकावले जात आहे. देशातील विरोधी पक्षाच्या 121 नेत्यांच्या विरोधात इडीने कारवाई केली आहे. ज्या लोकांवर इडीच्या केसेस होत्या, ते लोक भाजपसोबत आले. त्यांच्यावरील खटले मागे घेतले गेले, असे सिब्बल यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा: कदम, राणे, गोगावले रडारवर

आता लोकांना जागृत करण्याची वेळ आली आहे. अन्यायाच्या विरोधात आता लढण्याची गरज आहे. देशातील विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री, नेत्यांनी मला साथ द्यावी. आपण एक राष्ट्रीय मोहीम सुरू करू. गुलामी संपुष्टात यावी यासाठी ही चळवळ असेल.

ईडी भाजप मंत्र्यांवर नाही तर फक्त विरोधकांवरच कारवाई करते, सिब्बलांचा केंद्रावर निशाणा

येत्या 11 मार्च रोजी नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर एक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाणार आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले. येत्या 11 मार्च रोजी आम्ही आमचा अजेंडा लोकांसमोर मांडू, असे सिब्बल म्हणाले आहे.

Tags

follow us