उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा: कदम, राणे, गोगावले रडारवर

उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा: कदम, राणे, गोगावले रडारवर

-प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी)

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या खेडमध्ये (Khed) जाहीर सभा होत आहे. होळीच्या (Holi) निमित्ताने मुंबई-पुण्यात राहणारे अनेक कोकणी बांधव कोकणात जात असतात. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सभा वैशिष्ट्यपुर्ण असणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची कोकणात (Konkan) सभा होत आहे.

शिवसेना फुटीनंतर रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती. रामदास कदम शिवसेनेत असताना राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधान परिषद आमदार, कॅबिनेट मंत्री अशी सर्व पद त्यांनी उपभोगली आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद नाही मिळाल्यावर आपल्यावर अन्याय होत असल्याचा राग कदम यांनी आवळला आणि शिंदे गटात प्रवेश केला.

Mardini Chatrapati Tararani : सोनाली साकारणार छत्रपती ताराराणींची भूमिका

आता रामदास कदम यांच्या खेड मतदार संघात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. ही सभा एक तर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या ठाकरे गटात प्रवेशासाठी होत आहे. पण या सभेकडे अनेक अंगाने बघता येईल.

होळीच्या निमित्ताने कोकणातील लोक आपल्या गावी जात असतात. खेडसोबत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गुहागर मतदार संघातील कार्यकर्त्यांना यानिमित्ताने उर्जा मिळणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा रामदास कदम आणि भरत गोगावले यांच्यासाठी देखील इशारा असणार आहे.

कोकणात विशेषता रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प पुन्हा डोके वर काढत आहेत. हा प्रकल्प होणारच ही भूमिका भाजपा आणि नारायण राणे मांडत आहेत. त्यात आता पत्रकारची झालेली हत्या हा विषय कमालीचा तापला आहे. अशा परिस्थितीत रिफायनरी नको ही भूमिका घेणाऱ्या गटाला उद्धव ठाकरे यांची सभा प्रेरणादायी ठरणार आहे.

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा गड राहिला आहे. या भागातून सेनेचा खासदार आहे. आगामी काळात सिंधुदुर्ग आणि रायगड असे दोन्ही खासदार पदावर दावा करायचा असेल तर खेड या मध्यवर्ती ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. म्हणूनच की काय सभेच नियोजन अनंत गीते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

कोण आहेत संजय कदम?
संजय कदम हे खेड नगरपालिकेत एकेकाळी नगरसेवक होते. रामदास कदम यांचे कार्यकर्ते होते . उपनगाध्यक्ष झाले. पण पुढे रामदास कदम यांच्यासोबत वितुष्ट निर्माण झाले. त्यांनी राष्ट्रवदीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकिटकवर २०१४ मध्ये खेड विधान सभेत रामदास कदम यांचा परभव केला. आमदार झाले. पण रामदास कदम पराभूत झाले असले तरी शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेवर घेतले आणि कॅबीनेट मंत्री केले. या काळात संजय कदम यांची मोठी कोंडी झाली होती. आता संजय कदम पुन्हा स्वगृही परत येत आहेत.

वैभव खेडेकर फॅक्टरकडे लक्ष?
संजय कदम यांच्या प्रमाणे रामदास कदम यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे वैभव खेडकर काय भूमिका घेतात याकडे विशेष लक्ष असणार आहे. वैभव खेडेकर हे सध्या महारष्ट्र नवनिर्माण सेनेत आहेत. २००९ मध्ये खेड नगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला होता. राज्यात त्यावेळी खेड आणि यवतमाळ मधील दोनच नगरपालिका मनसेकडे होत्या. जर खेडकर आणि संजय कदम हे समीकरण जुळले तर रामदास कदम यांचं राजकीय भविष्य धोक्यात येईल अशी दोघांची ताकद आहे. उद्या उद्धव ठाकरे सभेच्या दरम्यान वैभव खेडेकर कुठे असणार याचीही चर्चा आहे.

आमदार योगेश कदम यांचा सांभ्रम?
पूर्वीच्या शिवसेनेत रामदास कदम मंत्रीपदापासून दूर झाल्यानंतर अस्वस्थ होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांचा मुलगा योगेशला उमेदवारी दिली. त्याच बरोबर रामदासभाई यांची दोन्ही मुले योगेश कदम आणि सिद्धेश कदम हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मानले जाऊ लागले. पण रामदास कदम यांनी शिंदे यांची साथ दिल्याचं जाहीर केलं. त्यावेळी दोन्ही मुलांनी काही दिवस या भूमिकेपासून अलिप्त राहिले होते. पण नंतर दोन्ही मुलांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube