Download App

निवडणुक आयोगाला मिळणार नवे आयुक्त; या अधिकाऱ्याचं नाव चर्चेत

Election Commission देशाला लवकरात लवकर निवडणूक आयुक्त मिळणार आहेत. कारण सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपणार आहे.

  • Written By: Last Updated:

Election Commission got new commissioner Dnyaneshwar Kumar in discussion : देशाला लवकरात लवकर निवडणूक आयुक्त मिळणार आहेत. कारण आता सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर सेवाजेष्ठतेच्या नियमानुसार वरिष्ठ निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याची शक्यता जास्त आहे.

‘गंगाधर ही शक्तिमान है’! धसांनी विश्वास गमावला, मुंडे भेटीवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

त्याचबरोबर आयोगामध्ये तिसरे नवे आयुक्त नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली निवड समितीची बैठक होईल. तर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे 18 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांनी अडीच वर्ष पदभार सांभाळला.

गुळाच्या सुरीनं नरडं कापलं, राजकीय सेटलमेंट…विश्वासघात; मुंडे-धसांच्या भेटीवर जरांगे पाटील संतापले

नव्या मुख्य निवडणूक आयुक्ताच्या निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी तीन सदस्यांची निवडसमिती बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्ष तसेच कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देखील सहभागी आहेत. या अगोदर निवडणूक आयोगाला असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर दोन पैकी सेवाजेष्ठतेच्या नियमानुसार तसेच निवृत्त होणाऱ्या आयुक्तांच्या सल्ल्याने आगामी आयुक्तांची निवड केली जात होती. मात्र आता निवड समिती आणि बहुमत या आधारे आयुक्तांची नेमणूक केली जाते.

तर 17 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीसाठी निवड समितीने तब्बल 480 उमेदवारी अधिकाऱ्यांमधून पाच जणांची नावे आगामी निवडणूक आयुक्त पदासाठी पाठवले आहेत ज्यामध्ये 1988 च्या बॅच अधिकारी आणि सध्याचे वरिष्ठ निर्वाचन आहेत ज्ञानेश कुमार यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहेत. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांनी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या अगदी काही दिवस अगोदर पदभार स्वीकारला होता.

follow us