Varanasi Gyanvapi Mosque : उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापी मशीदीचा (Varanasi Gyanvapi Mosque) वाद चव्हाट्यावर येणार असल्याची शक्यता आहेत. कारण ज्ञानवापी मशीदीतील तळघरात पूजा करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तळघरात पूजा करण्याचा निर्णय दिल्याच्या निषेधार्थ आज वाराणसीत बंदची हाक देण्यात आली आहे. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही, जरांगेची दादागिरी हाणून पाडणार : भुजबळांचा हल्लाबोल
ज्ञानव्यापी मशीदीचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुनावणीदरम्यान, 1991 पर्यंत व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार असल्याचा युक्तीवाद हिंदु पक्षाकडून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हिंदु पक्षाकडून मशीदीच्या तळघरात हिंदु देव-देवतांची पूजा करण्यात आली होती. न्यायालयाकडूनही ७ दिवसात पूज करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता मुस्लिम पक्षकारांकडून या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
वाराणसी येथील न्यायालयाने दिलेल्या सर्वेक्षणाच्या निर्णयाला मुस्लिम पक्षाने स्थगिती देण्यात यावी अशा मागणी केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना या सर्वेक्षणाला 26 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच कोर्टाने या मशीदीची तोडफोड केली जाऊ नये असे निर्देश दिले. यावर उत्तर प्रदेश सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्या ठिकाणी कोणतीही तोडफोड झाली नसल्याचं सांगितलं. या प्रकरणी मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात अर्ज करावा. ज्ञानवापी मशीद मॅनेजमेंन्ट कमिटी अंजुमन इंतजामिया मशीदने या सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी केली त्यावेळी त्यांच्याकडून ज्येष्ठ वकिल हुजैफा अहमदी यांनी बाजू मांडली.
Budget 2024 : महिला अन् गरीबांना ‘अच्छे दिन’, मध्यमवर्गीयांना झटका; मोदींच्या बजेटमध्ये कुणाला काय?
नेमका वाद काय?
1669 मध्ये मुघल शासक औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून मशीद बांधली होती, असा हिंदू पक्षाचा दावा आहे. तर काही लोक म्हणतात की मशीद आणि मंदिर अकबराने 1585 च्या सुमारास दीन-ए-इलाही अंतर्गत बांधले होते. औरंगजेब दीन-ए-इलाहीच्या विरोधात होता असे इतिहासकारांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी मंदिर पाडण्याचा आदेश दिला. मशिदीचा पहिला उल्लेख १८८३-८४ मध्ये आढळतो. अकबराच्या काळात तोडरमल यांनी काशी विश्वनाथ मंदिर बांधले होते, असे बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे.
सुमारे 100 वर्षांनंतर मंदिर पाडण्यात आले. इंदूरची राणी देवी अहिल्याबाई यांनी १७३५ मध्ये मंदिर बांधले, जे आजही अस्तित्वात आहे. ज्ञानवापी मशीद काढून पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी हिंदू बाजूची मागणी आहे. तर मथुरेच्या शाही ईदगाह मशिदीच्या खाली असलेली हिंदू बाजू श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला जात आहे.