‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही, जरांगेची दादागिरी हाणून पाडणार : भुजबळांचा हल्लाबोल
पुणे : सगेसोयरे आणि गणगोत याबाबतची अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते. त्यामुळेच आम्हाला नाही तर कोणालाच नाही’ अशी तुमची भाषा येऊ लागली आहे, असे म्हणत मंडल आयोगाला आव्हान देण्याचा आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा इशाारा देणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हल्लाबोल केला. (Minister and OBC leader Chhagan Bhujbal criticized Maratha reservation agitator Manoj Jarange Patil.)
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालन्यातून मुंबईच्या वाशीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण नवी मुंबईतील वाशीपर्यंत आल्यानंतरच शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. ज्यांची कुणबी म्हणून नोंद सापडली आहे त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना 27 जानेवारी रोजी राज्य सरकारने काढली. याच अधिसुचनेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश : कडवा विरोधकच सोबत आल्याने रामदास कदम टेन्शनमध्ये!
मात्र या अधिसुचनेला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी बोलताना मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर ज्या मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे ओबीसींना आरक्षण मिळाले आणि त्यानंतर यात विविध जातींचा समावेश होत राहिला, या प्रक्रियेलाच न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
यानंतर संपूर्ण ओबीसी समाजातून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. भुजबळ यांनीही यावरुन जरांगे पाटील यांना तुम्ही आव्हान द्याच, असे म्हणत जरांगे पाटील यांनाच एक प्रकारे आव्हान दिले आहे. त्यानंतर आता गेसोयरे आणि गणगोत याबाबतची अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते. त्यामुळेच आम्हाला नाही तर कोणालाच नाही’ अशी तुमची भाषा येऊ लागली आहे, असे म्हणत भुजबळ यांनी जरांगेंवर ‘एक्स’च्या माध्यमातून टीका केली.
‘तरच’ संभाजीराजेंना कोल्हापूरमधून उमेदवारी देणार! ‘मविआ’तील तिन्ही पक्षांची घातली एकच अट
काय म्हणाले छगन भुजबळ?
तुम्हाला आता ‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते आहे. नाहीच टिकणार! त्यामुळे ‘आम्हाला नाही तर कोणालाच नाही’ अशी तुमची भाषा येऊ लागली आहे
मंडल आयोगाला आव्हान देण्याची आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा ‘उपोषणकर्ते’ करत आहेत!
ज्या मंडल आयोगामुळे बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाजांतील गोरगरीब लोकांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळू लागली, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यास सुरुवात होऊन राज्याच्या धोरणनिर्मितीत त्यांचा विचार होऊ लागला आणि त्यांचा विचार घेतला जाऊ लागला, त्या मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा तुम्ही करता? एकीकडे याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, मागासवर्गीयांची लायकी काढता, ‘खुटा उपटण्याची’ भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता? हा काय प्रकार आहे?
मंडल आयोगाला आव्हान देण्याची आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा 'उपोषणकर्ते' करत आहेत!
ज्या मंडल आयोगामुळे बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाजांतील गोरगरीब लोकांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळू लागली, त्यांना…
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 1, 2024
यातून दोन निष्कर्ष स्पष्टपणे काढता येतात.
एक म्हणजे- ओबीसी जातींबद्दलचा तुमचा पराकोटीचा द्वेष यातून दिसतो. तुमच्या मनात या जातींबद्दल इतका द्वेष का आहे? त्यांनी तुमचं काय वाईट केलंय?
दुसरं म्हणजे- तुम्हाला आता ‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते आहे. नाहीच टिकणार! त्यामुळे ‘आम्हाला नाही तर कोणालाच नाही’ अशी तुमची भाषा येऊ लागली आहे!
अशा संविधानविरोधी गोष्टींना या देशात थारा नाही! महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज ही दादागिरी, हा असंवैधानिक प्रयत्न नक्कीच हाणून पाडणार, असाही इशारा त्यांनी जरांगे पाटील आणि मराठा समाजाला दिला आहे.