Gyanvapi Mosque : हिंदू पक्षाची याचिका कोर्टाने फेटाळली, तळघराच्या छतावर नमाज सुरूच राहणार

  • Written By: Published:
Gyanvapi Mosque : हिंदू पक्षाची याचिका कोर्टाने फेटाळली, तळघराच्या छतावर नमाज सुरूच राहणार

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi Masjid) सुरू असलेल्या खटल्यात हिंदू पक्षाला मोठा धक्का बसलाय. वाराणसी न्यायालयाने (Varanasi Court ) शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी करताना व्यास तळघराच्या छतावर नमाज (Namaj) अदा करण्यावर बंदी घालण्याबाबतची याचिका फेटाळली. मात्र, व्यास तळघरात सुरू असलेली पूजा सुरूच राहणार आहे.

Sharvari Wagh: शर्वरीला मिळालेल्या यशाबद्दल कबीर खान पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, ‘संपूर्ण इंडस्ट्री चर्चा…’ 

31 जानेवारी 2024 रोजी वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार व्यास तळघरचे कुलूप 31 वर्षांनी उघडण्यात आले होते. त्यानंतर ज्ञानवापीच्या व्यास तळघराच्या छतावर नमाजींच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हिंदू बाजूने कोर्टात दाखल करण्यात आली होती. छत जीर्ण झालं असून त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, असंही या याचिकेत म्हटलं होतं.

पाकिस्तानला झटका, चीनी कंपन्यांना दणका; अमेरिकेने ‘या’ प्रोजेक्टवर केली मोठी कारवाई 

16 डिसेंबर 2023 रोजी नंदीजी महाराज विराजमान यांच्या वतीने कानपूरच्या आकांक्षा तिवारी, दीपक प्रकाश शुक्ला, अमित कुमार आणि लखनौचे सुविद प्रवीण, लखनौ जन उद्घोष सेवा संस्थेचे सदस्य यांनी याचिका दाखल केली होती. दिवाणी न्यायाधीश हितेश अग्रवाल यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागील सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

दरम्यान, आज या प्रकरणावर सुनावणी करताना नमाजींच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली. तसेच न्यायालयाने तळघर दुरुस्तीला देखील परवानगी नाकारली. न्यायाधीश हितेश अग्रवाल यांनी हा आदेश दिला.

हिंदू बाजूचा युक्तिवाद – व्यास तळघराचे छत कमकुवत आहे, छतावरून पाणी टपकते, तळघराचे खांबही कमकुवत आहे. छतावर नमाजींची गर्दी जमल्याने छताचे नुकसान होत आहे, अशा स्थितीत, तळघर दुरुस्ती करावी, तसेच नमाजींना व्यास तळघराच्या छतावर जाण्यापासून रोखावे, असा युक्तीवाद करण्यात आला होता.

तर छत इतके कमकुवत नाही की, त्यावरून कोणी चालले तर ते खराब होऊ शकते, अ आम्ही अनेक वर्षांपासून छतावर नमाज अदा करत आहोत, असा युक्तीवाद मुस्मील पक्षाने केला.

दरम्यान, या खटल्याशी संबंधित अन्य बाबींमध्ये आगाऊ सुनावणीसाठी 19 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube