Download App

गुडन्यूज! आता PF खात्यातून काढता येतील 5 लाख रुपये; सरकारने नियमात केला बदल

एखाद्या आपत्कालीन प्रसंगात अॅडव्हान्स क्लेमच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑटोमॅटिक पद्धतीने काढता येईल.

PF Auto Settlement : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने देशभरातील (PF Auto Settlement) कोट्यावधी सभासदांना आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओने ऑटो सेटलमेंटच्या (PF Account) मर्यादेत वाढ केली आहे. आता सभासदांना 1 लाखांऐवजी 5 लाख रुपये खात्यातून काढता येतील. एखाद्या आपत्कालीन प्रसंगात अॅडव्हान्स क्लेमच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑटोमॅटिक पद्धतीने काढता येईल. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही रक्कम काढण्यासाठी कोणत्याही मॅन्यूअल तपासणीची गरज राहणार नाही.

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनी या निर्णयाची माहिती दिली. तत्काळ पैशांची गरज असणाऱ्या सभासदांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे. वैद्यकिय खर्चासाठी किंवा घराचे नुतनीकरण करण्यासाठी पैशांची गरज असेल तर ऑटोमॅटिक पद्धतीने पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम तत्काळ काढता येईल. कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडचणीविना आणि वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती मंडाविया यांनी दिली.

PF मधून कधी आणि किती पैसे काढता येणार? जाणून घ्या EPFO चे नवीन नियम

आधीचा नियम काय होता

अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम याआधी काढता येत होती. म्हणजेच एखाद्या सभासदाने एक लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम क्लेम केली असेल तर अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत ही रक्कम त्याला ऑटोमॅटिक पद्धतीने मिळत होती. काही दिवसांत पैसे खात्यात जमा होत होते. पण जर एक लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर यासाठी मॅन्यू्अल तपासणीची गरज पडत होती. यामुळे प्रक्रिया खूप वेळखाऊ बनली होती.

सरकारने नियम का बदलला

कोरोना संकटाच्या काळात (Covid 19) सरकारने ऑटो सेटलमेंटची सुविधा सुरू केली होती. परंतु, आता या नियमांत बदल करण्यात येत आहेत. सरकारने या नियमात बदल करुन लोकांना मोठा दिलासा दिला आहे. संकटाच्या काळात पैशांची गरज असते. अशा प्रसंगी कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडचणीविना पैसे उपलब्ध करून देणे हा आहे. पीएफ कर्मचारी आता कार्यालयात न जाताच ऑनलाइन पद्धतीने पीएफ अमाउंट क्लेम करु शकतात. तसेच पैसे मिळण्यासाठी जास्त वेळ थांबण्याचीही गरज राहणार नाही. ठराविक वेळेत पैसे संबंधित खातेदाराच्या बँक खात्यात जमा होतील.

कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पीएफ खात्याच्या हस्तांतरण प्रक्रियेचे नियम बदलले; जाणून द्या सर्वकाही

follow us