Download App

बिलाला विरोध केला तरीही ‘आप’ तुम्हाला.., केंद्रीय मंत्री अमित शाहांचा काँग्रेसला सल्ला

दिल्लीत केंद्र सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात अध्यादेश आणला जात आहे. त्यावरुन आम आदमी पक्ष आणि भाजपचे खासदार समोरा-समोर उभे ठाकले आहेत. या अध्यादेशाचं भाजपकडून समर्थन तर आम आदमी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यावरुनच आता काँग्रेस नेते अधीर चौधरी यांनीही या वादात उडी घेत टीप्पणी केली आहे. त्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला खोचक सल्ला दिला आहे.

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मंत्री अमित शाह म्हणाले, काही सदस्यांनी सांगितलं की, असा कायदा बनवायचा अधिकार सदनाला नाही. परंतु कोणत्याही विषयावर कायदा बनवायचा अधिकार या सदनाला आहे. काही सदस्यांनी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट दाखवून त्या निर्णयाचा अपमान आल्याचं म्हटलं आहे. पण 239 AA नुसार सरकारला कायदा बनवायचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आहे.

‘मेक इन इंडिया’साठी केंद्राचं मोठं पाऊल, लॅपटॉप, टॅबलेटच्या आयातीला लावला ब्रेक…

पंजाब प्रांतापासून वेगळं करून दिल्लीची स्थापना केली गेली. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यायला पंडित नेहरू, पटेल, राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता. तुम्ही ज्या गोष्टीचा विरोध करत आहात ती शिफारस पंडित नेहरू यांची होती, हे लक्षात घ्यावं. इतके वर्षे दिल्लीत आदलून बदलून आमचं आणि काँग्रेसचं सरकार होतं. पण कधी वाद झाला नाही. मात्र 2015 साली दिल्लीत सत्ता बदलली आणि त्या सरकारचा उद्देश सेवा करणं नाही तर वाद घालणं आहे, असा टोला शाहांनी लगावला.

नितीन देसाईंना ‘ते’ सहन झालं नाही; देसाईंच्या आत्महत्येवरून राऊतांचा भाजपवर संताप

बंगला बांधून केलेला भ्रष्टचार लपवणे हा यामागचा खरा उद्देश आहे. माझी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, निवडणुका जिंकवण्यासाठी अशा विधेयकांना विरोध करणे चुकीचं आहे. आघाड्या बनवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना समर्थन देऊ नका, तुम्ही दिल्लीचा विचार करा, अलायन्सचा विचार करू नका.. अलायन्स झाल्यानंतरही नरेंद्र मोदी पूर्ण बहुमताने पंतप्रधान बनणार आहेत.

अमित शाह यांनी काँग्रेसला एक सल्ला दिला. दिल्ली सरकारचे घोटाळे, गफले याला विरोधी पक्षांनी मदत करु नये. हे सगळा देश बघत आहे, लोक निवडणुकीत यांना समर्थन देणार नाहीत. मला काँग्रेसला सांगायचं आहे की, या बिलाला विरोध केल्यावरही आप आपल्याला पुढे आघाडीत समर्थन देणार नसल्याचं अमित शाह म्हणाले आहेत.

Tags

follow us