Download App

मोठी बातमी : १९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप

  • Written By: Last Updated:

Sajjan Kumar Verdict In 1984 Anti Sikh Riots Case : 1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी (Anti Sikh Riots Case )माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना (Sajjan Kumar) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ही शिक्षा (Court) सुनावली आहे. न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. पीडितेच्या बाजूने सज्जन कुमारला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सज्जन कुमारला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणात न्यायालयाने सज्जन कुमारला 12 फेब्रुवारी रोजी दोषी ठरवले होते.

1984 च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात दोषी ठरलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार आधीच दिल्ली कॅन्टमंट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील सरस्वती विहार भागात दोन शीख जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आज न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.

मोठी बातमी : १९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप

या घटनेशी संबंधित एफआयआर उत्तर दिल्लीतील सरस्वती विहार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. रंगनाथ मिश्रा आयोगासमोर तक्रारदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला. 12 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.

पुण्यात राजकीय भूंकप? गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरेंच्या ‘वाघिणी’ शिंदेंच्या संपर्कात

दिल्ली पोलिसांची मागणी काय होती?

दिल्ली पोलीस आणि पीडितांनी या प्रकरणात सज्जन कुमार यांच्या मृत्युदंडाची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निकालापूर्वी सज्जन कुमार यांनी शिक्षेत सौम्यता आणण्यासाठी अपील केले होते. त्यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटले की, या प्रकरणात मला मृत्युदंड देण्यास कोणताही आधार नाही. मी 80 वर्षांचा आहे. वाढत्या वयामुळे मला अनेक आजारांनी ग्रासले आहे. मी 2018 पासून तुरुंगात आहे. तेव्हापासून मला कोणतीही रजा/पॅरोल मिळालेली नाही.

ते म्हणाले, 1984 च्या दंगलीनंतर मी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सामील नाही. तुरुंगात माझे वर्तन नेहमीच चांगले होते. माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे माझ्यात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तीन वेळा खासदार राहिलो आहे. मी समाजकल्याणाच्या अनेक प्रकल्पांचा भाग आहे. मी अजूनही स्वतःला निर्दोष मानतो. या प्रकरणात, न्यायालयाने मानवी पैलू लक्षात घेऊन त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी.

follow us