Mira Road Murder Case : मनोज अन् सरस्वती आश्रमात यायचे तेव्हा ‘ती’ खूश होती पण…

Mira Road Murder Case : मनोज अन् सरस्वती आश्रमात यायचे तेव्हा ‘ती’ खूश होती पण…

Mira Road Murder Case : मुंबईच्या मीरा रोड भागात मनोज साने (Manoj Sane) नामक व्यक्तीने आपली लिव्ह इन रिलेशनमधील पार्टनर सरस्वती वैद्य (Sarswati Vaidya) हिची निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे तुकडे शिजवल्यानंतर कुत्र्याला खाऊ घातल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या हत्याकांडानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. आरोपी मनोज आणि सरस्वती दोघेही सोबतच अहमदनगरच्या आश्रमात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड CBI च्या जाळ्यात : 8 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालिका आश्रममध्ये आपल्या शैक्षणिक शिक्षणानंतर सरस्वती वैद्य ही 18 वर्षांची असताना मुंबईला रवाना झाली होती. मुंबईत मनोज साने हा माझा आहे, तो खूप श्रीमंत आहे, त्याची कपड्याची मिल असून मी त्याच्यापाशीच राहत असल्याची माहिती सरस्वती वैद्य हिने आश्रमात दिल्याचं आश्रमातील कर्मचारी अनु साळवे यांनी दिली आहे.

Pravin Darekar : ‘शरद पवार सत्तेबाहेर असतात, तेव्हाच दंगली होतात; विरोधकच दंगलींना जबाबदार’

सरस्वतीने मुंबई गाठल्यानंतर तिची रेशनच्या दुकानात मनोजशी भेट झाली होती. त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाली होती. त्यानंतर दोघेही मीरा रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. ज्या आश्रमातून सरस्वती आली होती. त्या आश्रमाच्या दाट आठवणी सरस्वती येत असल्याने सरस्वती आणि मनोज दोघेही कारमध्ये अहमदनरच्या बालिका आश्रमला भेट देत असतं. भेटीदरम्यान, दोघेही आश्रमातील इतर मुलींना जेवणासह कपडे, इतर वस्तू आणत असतं.

Mira Road Murder : सरस्वती, शिक्षण घेऊन मुंबईला गेली ती परतलीच नाही, अहमदनगर कनेक्शन उघडकीस

ज्यावेळी सरस्वती तिचं बालपण गेलेल्या आश्रमात यायची तेव्हा तिला बालपणाची आठवण होत, असायची त्यामुळे सरस्वती आश्रमात आल्यानंतर खूश असायची, याबद्दल स्वत: आश्रमधील कर्मचारी अनु साळवेंनी सांगितलं आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सरस्वती खूश दिसत नसल्याचं निदर्शनास आल्याचं साळवेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी मनाेजने सरस्वतीच्या हत्येच्या आरोपाचं खंडन केलं असून सरस्वतीची हत्या मी नाहीतर तर तिने हत्या केल्याचं मनोजने कबूलीदरम्यान, सांगितलं आहे. त्यामुळे आता ही हत्या की आत्महत्या? हे तपासणं पोलिसांसमोर आव्हानच असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube