Download App

दिल्लीत बाजी पलटली! आपला धक्का, एक्झिट पोलचा कौल भाजपला

Delhi Assembly Election एक्झिट पोलतून दिल्लीतील चित्र स्पष्ट आहे. ज्यामध्ये आपला दिल्लीत मोठा धक्का तर भाजपला मतदारांचा कौल मिळाला आहे.

Exit Poll of Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (दि. 5 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. हे मतदान येथील सर्व 70 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. आप, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत येथे झाली. यामधून कोण बाजी मारणार? हे येत्या 8 फेब्रुवारी आपल्याला कळणार आहे. मात्र त्या अगोदरच एक्झिट पोलच्या अंदाजातून दिल्लीतील चित्र स्पष्ट झालं आहे. ज्यामध्ये आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी दुसरीकडे मतदारांचा कौल मिळाला आहे.

उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद! दिल्ली विधानसभेसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडलं. नंतर लगेचच विविध संस्थांनी केलेले सर्वेक्षण आणि एक्झिट पोल समोर येत आहेत. ते पुढील प्रमाणे :

PEOPLE’s INSIGHT च्या सर्व्हेमध्ये बीजेपी भाजपचा फायदा तर आपचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

– भाजप : 40-44
– आप : 25-29

धनंजय मुंडेंच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना… आणखी एक प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता

JVC च्या सर्व्हेमध्ये देखील भाजपला जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार दिल्लीत भाजपला 39 ते 45 जागा मिळू शकतात.तर आपला 22 ते 31 जागांवर समाधान मानावे लागू शकते.

– भाजप : 39-45
– आप : 22-31

Chanakya Strategies च्या सर्व्हेमध्ये देखील आपची तीच परिस्थिती आहे. मात्र त्यात कॉंग्रेसला दिलासा देणारं चित्र आहे.

– भाजप : 39-44
– आप : 25-28
-कॉंग्रेस : 2-3

तुम्ही बिनजोड पैलवान, आशीर्वाद राहू द्या…; ठासून भाषण करता करता धस अचानक झाले भावूक

MATRIZE च्या सर्व्हेमध्ये मात्र आप आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

– भाजप : 35-40
– आप : 32-37
-कॉंग्रेस : 1

तर पोल डायरीनुसार दिल्लीत थेट सत्ताबदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार

– भाजप : 42-50
– आप : 18-25
-कॉंग्रेस : 0-2

पुण्यात रंगणार हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा जंगी आखाडा; पुनीत बालन ग्रुपचाही पुढाकार

चुरशीची निवडणूक

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षानं (आप) सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याकरिता विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले आहेत. उल्लेखीय बाब म्हणजे इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि आपचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभेत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us