Download App

Farmers at Punjab Haryana Border : MSP चा मुद्दा तापला! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; पोलिसांनी सीमेवरच रोखलं…

एमएसपी कायद्याच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करीत असतानाच पंजाब-हरयाणा सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय.

Farmers at Punjab Haryana Border : एमएमपी कायद्याचा (MSP) मुद्दा चांगलाच तापल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. एमएसपीच्या मुद्द्यासह विविध मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांकडून लॉंगमार्च मोर्चा (Farmers Protest Punjab-Hariyana) काढण्यात आलायं. यावेळी मोर्चा आज दुपारच्या सुमारास दिल्लीकडे कूच करीत असतानाच हरयाणा पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय. पंजाब-हरयाणा सीमेवर पोलिसांकडून आंदोलकांवर आधी फुलांचा गोळ्याचा मारा नंतर अश्रूधुराचा मारा करण्यात आल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 101 शेतकऱ्यांनी दिल्लीकडे लॉंगमार्च मोर्चा काढला. पंजाबमधून निघालेला हा मोर्चा पंजाब-हरयाणा सीमेवर दाखल होताच पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवलायं. यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली असून मोर्चासाठीची परवानगीची विचारपूस पोलिसांकडून केली जात आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखलं असून त्यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसएस 163 नूसार नोटीस बजावण्यात आलीयं.

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर दावा, 103 जणांना पाठवली नोटीस

आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांचा उद्रेक शांत करण्यासाठी पोलिसांकडून फुलांच्या गोळ्याचा मारा करण्यात आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. या फुलांच्या गोळ्यामध्ये केमिकल मिसळल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आलायं. यावेळी अनेक शेतकरी जखमी झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आलायं.

दरम्यान, पंजाब-हरयाणा सीमेवर शेतकर्‍यांचं आंदोलन पोहोचलं असून सध्या या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आलंय. तर पुढील आंदोलनाबाबतची अपडेट पत्रकार परिषदेत शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

follow us